आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"चला करू अकोला स्वच्छ' बघता काय, सहभागी व्हा!- मकरंद अनासपूरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अस्वच्छतेबाबत केवळप्रशासन आणि शासनाला दोष देऊन कधीही स्वच्छ सुंदर अकोला निर्माण होणार नाही. अकोला शहराला खरोखरच स्वच्छ सुंदर करायचे असेल, तर त्यात प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या कर्तव्यासोबतच नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेबाबत संकल्प करणार नाही, अस्वच्छता होण्याबाबत दक्ष राहणार नाही तोपर्यंत स्वच्छ सुंदर अकोला शहराचे स्वप्न साकारणार नाही. प्रशासनाच्या वतीने काही उपाययोजना, नागरिकांची जागरूकता वाढल्यास हे सहज शक्य आहे. चला त्यासाठी पुढाकार घेऊ या. स्वच्छतेसाठी सर्वात महत्त्वाची अडचण आहे ती प्लास्टिक पिशव्यांची. या पिशव्यांमुळे कचरा उचलणे, त्याची विल्हेवाट लावणे जिकिरीचा मुद्दा झाला आहे. याचबरोबर नाल्या चोकअप होण्यासही प्लास्टिक पिशव्या कारणीभूत आहेत. शहरात दररोज निर्माण होणारा कचरा त्याच्या विल्हेवाटीत येणाऱ्या अडचणी, या समजून घेऊन प्रत्येकाने या स्वच्छता अभियानात सहभागी होणे गरजेचे आहे. शहरात दररोज निर्माण होणारा कचरा आणि कचरा उचलण्याची क्षमता यात तफावत असल्याने शहरात दररोज ४५ ते ५० टन कचरा डंप होतो. हा डंप होणारा कचराच डोकेदुखी ठरला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळेच घरात, घराबाहेर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सर्वांनी सहभाग घेतल्यास या समस्येतून शहराची सुटका होऊ शकते. या अनुषंगाने आमदार, महापौर, उपमहापौर, नगरसेवक, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक यांच्याशी "स्वच्छ अकोला'बाबत संवाद साधला असता, यातून सर्वांनीच "स्वच्छ अकोला' होण्यासाठी संकल्प घेण्याची तयारी दर्शवली, तर मग चला करू या "स्वच्छ अकोला.'
दे शात सध्या स्वच्छतेचे वारे वाहत आहेत. स्वत: पंतप्रधानांनी स्वच्छ भारतासाठी पुढाकार घेतला आहे. शासकीय पातळीसह सर्वसामान्यांमध्येही स्वच्छतेची जागृती होत आहे. असे चित्र निर्माण होत असले तरी एवढ्यावर अकोला स्वच्छ होणार नाही. त्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. आज अकोल्याची ओळख म्हणजे प्रचंड घाण असलेले जागोजागी कचरा आणि कायमची धूळ असलेले शहर अशी आहे. काही वर्षांपूर्वी आदर्श असलेल्या शहराची आजची ही स्थिती बदलण्याची वेळ आली आहे. महापालिकेने शहर स्वच्छ आणि सुंदर करावे ही सर्वांचीच अपेक्षा आहे. ती अगदी बरोबरही आहे. पण, शहराच्या समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे. संपूर्ण शहर कचरामुक्त आणि चकाचक करणे, ही आता कोणत्या एका संस्थेच्या आवाक्यातला राहिलेला विषय नाही. स्वच्छतेसारख्या अत्यावश्यक बाबीसाठी आता प्रत्येकाला संकल्प करण्याची वेळ आली आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनात स्वच्छतेबद्दल सकारात्मक विचार करायला सुरुवात केली, त्या दृष्टीने पावले उचलण्याचे ठरवले, तरच हे काम सोपे होणार आहे. "दिव्य मराठी'ने अकोला शहर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एका महा अभियानाची घोषणा आज आपण करत आहोत. संकल्प करा आपले शहर आपणच स्वच्छ, कचरामुक्त करू चकाचक ठेवू यासाठी फक्त हवा आहे आपला सकारात्मक प्रतिसाद, शहराच्या प्रथम नागरिक महापौर, उपमहापौरांनीही स्वच्छ अकोल्याचा ध्यास घेतला आहे. प्रशासनही यासाठी आग्रही आहे. लोकप्रतिनिधींनीही स्वच्छ अकोला मोहिमेसाठी संकल्प केला आहे. आपणही पुढे या स्वच्छ अकोल्यासाठी पुढाकार घ्या. शहर स्वच्छतेसाठी आवश्यक बाबींचा आपण पाठपुरावा करू. स्वयंप्रेरणेने या मोहिमेसाठी पुढे येणाऱ्यांची दखल घेऊ. आपल्या संकल्प सहभागाशिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही. संकल्प सिद्धीस जाण्यासाठी चला, तर सगळे मिळून पुढाकार घेऊ आणि "अकोला स्वच्छ सुंदर बनवू.'

-शहरस्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु, महापालिकेची विद्यमान स्थिती लक्षात घेता, अकोला शहर स्वच्छ सुंदर होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. परंतु, प्रभागाला स्वच्छतेचे मॉडेल मात्र निश्चित करेन, असे विनोद मापारी यांनी सांगितले.

अभियान यशस्वी करा
-सअमरावतीविभागातील जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी क्रीडा सांस्कृतिक महोत्सवात जो उत्साह दाखविला तोच कायम राखून स्वच्छता अभियानासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन अमरावती विभागाचे आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी केले.

प्रत्येकाला प्रेरित करू
-स्वच्छतेचेमहत्त्व साधुसंतांनीही पटवून दिले आहे. ते नागरिकांना समजणे गरजेचे आहे. त्यामुळेच दररोज संपर्कात येणाऱ्या नागरिकांना सर्व प्रकारच्या स्वच्छतेसाठी प्रेरित करू, असे आमदार गोवर्धन शर्मा यांनी सांगितले.

आमदारांचाही सकारात्मक पुढाकार
महापालिकेत एकूण ७४० सफाई कामगार कायम आस्थापनेवर कार्यरत आहेत. यात ३५३ महिला, तर ३८७ पुरुष आहेत. महिला सफाई कामगारांकडे मुख्य रस्त्याच्या झाडलोटीचे काम सोपवण्यात आले आहे, तर पुरुष सफाई कामगारांकडे नाली, तसेच इतर स्वच्छतेची कामे सोपवण्यात आली आहेत.
तुम्ही शहर, राहता त्या ठिकाणचा परिसर अस्वच्छ करणार नाही याचे आम्हाला वचन द्या. यासाठी आम्हाला AkolaPromise लिहून9822690481 या नंबरवर sms करा.
तुम्ही वॉटस्अॅपच्या माध्यमातूनही तुमचे वचन AkolaPromise लिहून8888430193 वर पाठवू शकता.
तुमची संस्था, संघटना किंवा सोसायटीचे वचन पत्र आम्हाला dmakola13@gmail.comवरईमेल करू शकता.
तुम्ही शहर, राहता त्या ठिकाणचा परिसर अस्वच्छ करणार नाही याचे आम्हाला वचन द्या. यासाठी आम्हाला AkolaPromise लिहून9822690481 या नंबरवर sms करा.
तुम्ही वॉटस्अॅपच्या माध्यमातूनही तुमचे वचन AkolaPromise लिहून8888430193 वर पाठवू शकता.
तुमची संस्था, संघटना किंवा सोसायटीचे वचन पत्र आम्हाला dmakola13@gmail.comवरईमेल करू शकता.
शहरातील विविध संस्था, संघटना, महाविद्यालय, शाळा यांच्या माध्यमातून स्वच्छतेिवषयी जनजागृती केली जाईल. लोकप्रतिनिधी, नगरसेवक, शासकीय अधिकारी, सामान्य नागरिक यांना यात सहभागी केले जाईल.
तुम्ही शहर, राहता त्या ठिकाणचा परिसर अस्वच्छ करणार नाही याचे आम्हाला वचन द्या. यासाठी आम्हाला AkolaPromise लिहून9822690481 या नंबरवर sms करा.
तुम्ही वॉटस्अॅपच्या माध्यमातूनही तुमचे वचन AkolaPromise लिहून8888430193 वर पाठवू शकता.
तुमची संस्था, संघटना किंवा सोसायटीचे वचन पत्र आम्हाला dmakola13@gmail.comवरईमेल करू शकता.

तुमची संस्था किंवा संघटनेचे वचन पत्र तुम्ही, संपादक दैनिक दिव्य मराठी, अमानखांॅ प्लाॅट बँक ऑफ बडोदाच्या वर, शास्त्रीनगर, अकोला या पत्त्यावर पाठवू शकता.

संकलन : श्रीकांत जोगळेकर -मांडणी सजावट : विजयकुमार देशमुख