आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफाईस नकार देणे भोवले, लिपिक निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी स्वच्छता अभियान राबवले. दरम्यान, हातात झाडू घेऊन साफसफाई करण्यास नकार देणाऱ्या नीलेश पिंपळकर या कर्मचाऱ्यावर ऑनस्पॉट निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
महिन्यातून दोनदा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये स्वच्छता अभियान राबवले जाते. या अभियानांतर्गत शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विविध विभाग परिसराची स्वच्छता करण्यात आली. सर्व विभागांच्या विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
मात्र, आपल्या विभागात स्वच्छता सुरू असल्याचे पाहून बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक नीलेश पिंपळकर यांनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. पिंपळकर यांना सीईओंनी हटकले असता, त्याने मी साफसफाई करणार नाही, असे प्रतिउत्तर दिले. त्यामुळे स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या या कर्मचाऱ्याला सीईओ एम. देवेंदर सिंह यांनी ऑनस्पॉट निलंबित केले. या कारवाईने इतर कर्मचाऱ्यांनी हातातील झाडूला वेग दिला. कोणताही कर्मचारी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेस विरोध दर्शवील त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, असे निर्देश सीईओंनी दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...