आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Climate News In Marathi, Amravati City Change Weather Issue, Divya Marathi

तासातासाला बदलतेय शहराचे हवामान, हवामान केंद्रात होताहेत अजब नोंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- दर तासाला बदलणार्‍या हवामानाचा अमरावतीकर मागील काही दिवसांपासून अनुभव घेत आहेत. सततच्या या बदलांमुळे हिवाळा सुरू आहे, उन्हाळा की पावसाळा, असा पेच अमरावतीकरांना पडत आहे.

सतत होत असलेला हा बदल अमरावतीकरांनाच जाणवतोय असे नव्हे, तर नागपूर येथील हवामान विभागातील उपकरणेही दर तासाला हवामानात होणारे हे अजब बदल अचूकपणे नोंदवत आहेत. हवामान विभाग आणि केंद्रीय हवामान खाते अशा दोन्ही विभागांच्या प्रयोगशाळा नागपुरात आहेत. तेथून विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या तीन ठिकाणांच्या हवामानाची नोंद उपग्रह मापकांच्या आधारे घेतली जाते. शुक्रवारी अमरावतीकरांनी सकाळी गारवा, दुपारी उन्हाचे चटके आणि सायंकाळी पाऊस असा तिहेरी अनुभव घेतला.

हवेने बदलली दिशा : सकाळी आठच्या सुमारास आग्नेय दिशेकडे हवा वाहत होती. दुपारी बारानंतर हवेची दिशा बदलत गेली. बाराला दक्षिणेकडे वारे वाहू लागले. त्यानंतर वार्‍याची दिशा नैऋत्येकडे वळली. पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी वारे नैऋत्येकडे ताशी 3.5 किलोमीटर वेगाने वाहत होते, अशी नोंद नागपुरातील उपग्रह केंद्राने घेतली आहे.

आग्नेयातील कमी दाबाचा परिणाम : भारतीय मौसम विभागाने जाहीर केलेल्या वृत्तांतानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तो आग्नेयाकडून नैऋत्येकडे सरकत असल्याने नमूद आहे. उत्तरेतील हिमवृष्टी आणि दक्षिणेतील कमी दाब यामुळे पुढील तीन दिवसांकरिता पश्चिम विदर्भामध्ये अकाली पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ढगाळ वातावरणाचे प्रमाण
सकाळी 08 - 21 %
दुपारी 12 - 57 %
दुपारी 02 - 66 %
दुपारी 04 - 68 %
दुपारी 04.44 - 56 %

हवामान विभागाच्या नागपूर येथील सॅटेलाइट डॉप्लर रडारने नोंदवलेल्या बदलांनुसार, दुपारी बारानंतर अमरावतीमध्ये ढगाळ वातावरणात वाढ झाली. हे वातावरण असे बदलत गेले.

दुपारनंतर ढगाळ अनुभव
सायं. 6.30 वाजता
तापमान - 31.9 अंश
आद्र्रता - 46 %
वातावरण - दमट गारवा

सायं. 04.44 वाजता
तापमान - 31.7 अंश
आद्र्रता - 32 %
वातावरण - तुरळक पाऊस

दुपारी 04 वाजता
तापमान - 31.8 अंश
आद्र्रता - 37 %
वातावरण - दमट वारे

दुपारी 02 वाजता
तापमान - 30.2 अंश
आद्र्रता - 33 %
वातावरण - ढगाळ

दुपारी 12 वाजता
तापमान - 28 अंश
आद्र्रता - 38 %
वातावरण - उन्हाचे चटके

सकाळी 08 वाजता
तापमान - 20 अंश
आद्र्रता - 43 %
वातावरण - दमटपणा