आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील रक्तपेढ्यांना सवलतीच्या दरात वीज !, मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रक्तपेढ्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जामंत्र्यांना याबाबतचे आदेश दिले असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.

महाराष्ट्रातील रक्तपेढ्या गरजू लोकांना वेळोवेळी रक्तपुरवठा करतात. या पेढीमध्ये साठवलेले रक्त टिकून राहण्यासाठी २४ तास वीजपुरवठ्याची गरज भासते. मात्र विजेचे दर रक्तपेढीला परवडणारे नाहीत. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील नगरसेविका अॅड. धनश्री अभ्यंकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन एका पत्राद्वारे देण्यात आले असल्याची माहिती अभ्यंकर यांनी दिली. त्या दृष्टीने रक्त्यपेढ्यांची माहिती संकलित करण्याचे कामही सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील रक्तपेढ्यांना सवलतीच्या दरात विद्युत पुरवठा केल्यास त्याचा फायदा गरजू लोकांना होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी विनंती यात करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती अभ्यंकर यांनी दिली.

दरम्यान, राज्य शासनाने रक्तपेढ्यांना आता सवलतीच्या दरामध्ये वीज पुरवठा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे. आरोग्य विभागाकडून रक्तपेढ्यांची संख्या व संख्येबाबत डाटा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यतील आरोग्य विभागाकडून याबाबतचा अहवाल एप्रिलअखेरपर्यंत राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.