आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • CM, Tell Me Live Or Not ? Tenth Class Mayur Ask Fadnavis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीएम साहेब, सांगा मी जगू की मरू ? दहावीत शिकणा-या मयूरचा मुख्‍यमंत्र्यांना सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दोनमहिन्याचा होतो तेव्हा आईला बापाने मारले. आई देवाघरी गेली अन् बाप जेलात.. आईचे प्रेम काय असते माहीत नाही अन् बापाचेही प्रेम वाट्याला आले नाही.. आजी आता १०२ वर्षांची झाली. ती गेल्यावर मी काय करू, कुठे राहू.. काय खाऊ. प्रशासनाचे उंबरठे झिजवले, मात्र ना योजनेतून घर मिळत ना वावरात विहीर मिळत. तुम्हीच सांगा माझ्या वाट्याचे अच्छे दिन कुठे आहेत? अशा आशयाचे निवेदन घेऊन १५ वर्षांचा मुलगा मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी कारंजाहून अकोल्यात आला होता. मात्र, त्याला मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचण्यात कुणीही मदत करत नव्हते.

मयूर गणेश कोहर (वय १५) असे त्या मुलाचे नाव आहे. कारंजा तालुक्यातील पारवा कोहर हे त्याचे गाव. तो दोन महिन्याचा होता तेव्हा त्याच्या आई आणि वडिलांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात वडिलांकडून आईचा खून झाला. आई-वडिलांची उणीव काही अंशी भरून काढत आजीने त्याचे संगोपन केले. आजी आता १०२ वर्षांची झाली आणि तो १५ वर्षांचा. आईच्या हत्येच्या आरोपाखाली मयूरच्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ते आता मोर्शी येथील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मयूरच्या वडिलांची थोडीफार जमीन आहे. वाढत्या वयाबरोबरच त्याला आता कळू लागले आहे. त्यामुळे त्याने शेतात शासकीय योजनेतून विहीर खोदून मिळावी म्हणून अर्ज केला. घरकुल योजनेतून निवारा मिळावा म्हणून त्याने ग्रामविकास यंत्रणेकडे अर्ज केला. मात्र, ग्रामसेवकाने तर चक्क तुला लाभ मिळत नाही, असे सांगितले. त्यानंतर त्याने आमदार आणि जिल्हाधिका-यांचा दरवाजा ठोठावला. त्यांनी आदेशित तर केले, मात्र अद्यापही प्रत्युत्तर आले नाही. गुरुवारी मुख्यमंत्री कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात येत असल्याची माहिती मयूरला मिळाली. ही संधी साधत तो आला आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यापुढे त्याचे निवेदन पोहोचण्यास अडचणी येत असल्यामुळे तो आशाळभूत नजरेने मुख्यमंत्र्यांकडे पाहू लागला. मात्र, शेवटी 'दिव्य मराठी'च्या मदतीने सुरक्षारक्षकांमार्फत त्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले.

दिले निवेदन
गुरुवारीमुख्यमंत्री कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात येत असल्याची माहिती मयूरला मिळाली. ही संधी साधत तो आला आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करू लागला. शेवटी सुरक्षारक्षकांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आले.