आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो रुपयांनी सोसायटीला गंडवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - बनावट दस्तऐवजाच्या आधारे श्री रेणुका मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीची फसवणूक करणार्‍या निलंबित सहायक शाखाधिकार्‍याला रामदासपेठ पोलिसांनी रविवारी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता. सुग्रीव रामनाथ खेडकर (रा. चकलांबा, ता. गेवराई, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शहरातील टिळकरोडवरील श्री रेणुका मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये एका गुंतवणूकदाराने नऊ लाख सात हजार रुपये मुदत ठेवीच्या स्वरूपात गुंतवले. क्वॉर्टर एन्डिंगच्या वेळी सोसायटीने थकबाकीदारांना कर्ज भरण्याबाबत कळवले. 25 डिसेंबरला संबंधित गुंतवणूकदारही आला. सोसायटीने त्यांना थकबाकी असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी आपण कर्ज घेतले नसल्याचे सांगत मुदत ठेव पावतीही दाखवली. त्यानंतर संबंधित गुंतवणूकदाराच्या मुदत ठेव पावतीच्या आधारे अर्बन क्रेडिट सोसायटीकडून सात लाख 20 हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याची बाब उजेडात आली. यासाठी देण्यात आलेल्या संबंधित कागदपत्रांवर त्यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करण्यात आल्या तसेच त्यांना बनावट ठेव पावतीही दिल्याची बाब या दरम्यान निदर्शनास आली.

दरम्यान, याप्रकरणी सोसायटीचे पासिंग ऑफिसर विलास मंगलसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी निलंबित सहायक शाखाधिकारी सुग्रीव रामनाथ खेडकर याच्याविरुद्ध भादंविचे कलम 406, 409, 420, 467, 468 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सुग्रीव खेडकर आणि इर्शाद हुसेन इरफान हुसेनला अटक केली. या दोघांचीही 1 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.