आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला- महाविद्यालयात अभ्यासू विद्यार्थ्यांबरोबर काही शिक्षणाच्या नावाखाली ‘एन्जॉय’ करण्यासाठी येतात.‘एन्जॉय’ करण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांमुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. मात्र, आता महाविद्यालयातील धिंगामस्तीला चाप बसणार आहे. महाविद्यालयातील मस्तीला लगाम लावण्यासाठी विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाने विद्यापीठाला दिल्या आहेत. महाविद्यालयात होणार्या गैरकारभारावर आळा बसावा, म्हणून राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने विद्यापीठांना ‘लक्ष’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महाविद्यालयीन जीवन उत्साह व आनंदाचे असते. मात्र, आता महाविद्यालयाच्या कट्टय़ांवरून गैरप्रकाराला चालना मिळू लागली आहे. यावर आळा बसवण्याचे मोठे आव्हान शासनापुढे आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून होणार्या धांगडधिंग्यावर आता राज्यात बंधने लावण्यात येणार आह़े महाविद्यालयांमध्ये फ्रेशर्स, व्हॅलेंटाइन डे, फ्रेंडशिप डेच्या नावाखाली अनेकदा पाटर्य़ा रंगतात़ बरेचदा यात अनेक गैरप्रकारही घडतात. सुव्यवस्था राखताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही वस्तुस्थिती अनेकवेळा समोर आली आहे. ते रोखण्यासाठीच अशाप्रकारच्या पाटर्य़ांवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आश्वासनाची अंमलबजावणी
महाविद्यालयातील गैरकारभाराला ब्रेक लावण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन विधानसभेत अधिवेशनादरम्यान दिले होते. त्याची अंमलबजावणी करताना शिक्षण विभागामार्फत विद्यापीठांना महाविद्यालयांवर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अंकुश लावणे कठीण
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गैरप्रकारावर अंकुश लावण्याचा निर्णय घेतला असला तरी महाविद्यालयांसाठी त्याची अंमलबजावणी कठीण आह़े या प्रकारात महाविद्यालयांबाहेरील विद्यार्थीही सहभागी होतात. त्यावर महाविद्यालय कसे नियंत्रण मिळवू शकेल, हा एक जटील प्रश्नच आहे.
जनजागृती आवश्यक
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. त्यामुळे त्यांना चांगले संस्कार व त्यांच्यामध्ये जनजागृती केल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकते. शासनाचा चांगला निर्णय आहे.
-डॉ. सुभाष भडांगे, प्राचार्य, श्री. शिवाजी महाविद्यालय, अकोला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.