आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collector Doing Discrimination Issue At Akola, Divya Marathi

जिल्हाधिकार्‍यांचे झुकते माप; निविदेत अनियमितता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ‘व्हिडिओ चित्रीकरणाची कमी किमतीची निविदा भरणार्‍या अमरावती येथील चाकोते स्टुडिओला पूर्ण काम न देता ते विभागून देण्याचा नियमबाहय़ आदेश जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी दिला आहे. हे काम न करण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, झालेल्या अर्थकारणाचा शोध घ्यावा’, अशी तक्रार चाकोते स्टुडिओचे संचालक उदय चाकोते यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी, अकोला यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

दैनिक दिव्य मराठीने सोमवार, 17 मार्च रोजी निवडणूक कामाची अद्याप निविदा नाही, असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने व्हिडिओ चित्रीकरणाची निविदा काढली. पण, त्यातही अनेक ठिकाणी अनियमितता करून ठेवली आहे. गुरुवार, 27 मार्च रोजी व्हिडिओ चित्रीकरणाच्या प्रत्येक कॅमेर्‍याचे रेट काढले व निविदा खुली केली.

त्यात चाकोते स्टुडिओचे दर सर्वात कमी (एल-वन) होते. असे असताना त्यांना निविदेतील अटीनुसार काम देण्याची गरज होती. पण, त्यानंतर त्यांना तुम्ही अमरावतीत 941 रुपये प्रती कॅमेर्‍याच्या दरानुसार काम करत आहे. त्यानुसार काम करा, अन्यथा दुसरा विचार करू, असे सांगण्यात आले. तेव्हा चाकोते स्टुडिओने 941 रुपयात सर्व काम करण्याची लेखी संमती जिल्हाधिकार्‍यांना कळवली होती. पण, त्यानंतरदेखील जिल्हय़ाचे संपूर्ण काम चाकोते स्टुडिओ यांना दिले नाही. 29 मार्च रोजीचा कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) आज 30 मार्च रोजी दिली.

या आदेशात चाकोते स्टुडिओबरोबर अकोला येथील राजेश्वर एजन्सीजचे (एल-टू) सतीश सराफी यांनादेखील काम दिल्याचे आदेशात नमूद केले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी मनमानी पद्धतीने व नियमबाहय़पणे व्हिडिओ चित्रीकरणाचे काम राजेश्वर एजन्सीजला दिल्याचा आरोप उदय चाकोते यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी मुख्य निवडणूक आयुक्तांनी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

वाचले 17 लाख रुपये
सुमारे 400 कॅमेरे निवडणूक काळात लागणार आहे. यातील जवळपास 200 कॅमेरे हे येत्या दहा दिवसात लागतील, तर उर्वरित 200 कॅमेरे हे शेवटच्या दोन दिवसात लागतील. जिल्हा परिषद निवडणुकीत 1,650 रुपये दराने काम देण्यात आले होते. आता मात्र 941 रुपये प्रती कॅमेरा प्रती दिवस देण्यात आला आहे. हा फरक पाहिल्यास व होणार्‍या कामांचे दिवस मोजल्यास दिव्य मराठीच्या एका वृत्तामुळे प्रशासनाचे सुमारे 17 लाख रुपयांची बचत झाली आहे.