आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"पोस्टकार्ड' द्वारेही संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नवोदय विद्यालयातील चांगल्या वाईट घडामोडींची नोंद आता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत स्वत: घेणार आहेत. नवोदय विद्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. नवोदय विद्यालय देशात मॉडेल कसे बनेल, यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

गतवर्षी झालेला घृणास्पद प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे यांनी नवोदय विद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी शुद्ध पाणी मुलांना मिळेल, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थी वसतिगृहाची पाहणी करून अडीअडचणी जाणून घेतल्या, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाप्रति गोडी निर्माण केली कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तत्काळ महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर देणार, एक विद्यार्थी एक वृक्ष संकल्पना राबवून नवोदय विद्यालयाच्या परिसरात वृक्षलागवड करण्याबाबत सूचना दिली. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी विद्यार्थी संसद संकल्पनेच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया घेणार, प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील, र्इ-लर्निंगसाठी अद्ययावत संगणक कक्ष तयार करण्यात येतील, मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डोळे तपासणी शिबिर, दंतचिकित्सा शिबिर, मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिर राबवणार, सर्व खेळांसाठी अद्ययावत सामग्री उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी चांगल्या प्रकारचे ग्राउंड तयार करण्याबाबत सूचना दिल्या.

उच्चध्येय गाठा
विद्यालयातीलघडामोडीवर लक्ष आहे. कोणताही अनुचित प्रकार झाल्यास तत्काळ संपर्क साधावा. नवोदय विद्यालयात शिकण्याची उत्तम संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. या संधीचे सोने करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. उच्च ध्येय ठेवून या शैक्षणिक वातावरणाचा फायदा घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.

तक्रार पेटी लावावी
मुलींचीकाळजी घेण्यासाठी दरमहिन्याला प्रत्येक वर्गातील मुलांना महसूल विभागाकडून पोस्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येतील. त्यांनी चांगल्या वाईट बाबी त्यामध्ये लिहून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्याबाबतचा उपक्रम राबवण्यात येत आहे. दर्शनी भागावर तक्रार पेटी ठेवण्यात येईल, दरमहिन्याला त्यामध्ये प्राप्त तक्रारीची दखल जिल्हाधिकारी यांच्याकडून घेण्यात येईल.
नवोदय विद्यालयाला भेट देऊन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.