आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस बंदोबस्ताचा झाला अतिरेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येणार्‍या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना रोखण्याच्या नावाखाली नागरिक आणि इतर विभागातील कर्मचार्‍यांची पोलिसांनी आज अडवणूक केली. या अतिरेकी बंदोबस्ताचा फटका वार्तांकनास गेलेल्या पत्रकारांना बसला.
पोलिसांनी पत्रकारांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार सोडण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्त व मोकळ्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया होत आहे की नाही, याविषयी शंका निर्माण होत आहे.लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास येणारे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयास पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आज इकडे फिरकलेच नाहीत, त्यामुळे त्यांना अडवण्यासाठी असलेल्या पोलिसांनी नागरिक, शासकीय कर्मचार्‍यांची अडवणूक करत बंदोबस्ताचा अतिरेक केला. उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या वेळेपर्यंत सर्वांसाठी ही अडचण कायम होती.
कर्मचार्‍यांचीदेखील अडवणूक
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या माध्यमातून काम चालते. या विभागातील काही कर्मचारी हे बाहेर कामासाठी गेले असता त्यांना पोलिसांनी थांबवले. यापैकी काही कर्मचार्‍यांजवळ ओळखपत्र असताना त्यांना रोखण्यात आले. अखेर संबंधित अधिकार्‍यांनी प्रवेशद्वारापर्यंत येत त्यांची सुटका केली.