आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलन हायड्रोथेरपी तंत्रज्ञान अकोल्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक दर्जाचे कोलन हायड्रोथेरपी तंत्रज्ञान आता अकोल्यात उपलब्ध झाले असून, आज १३ जूनपासून श्रीनिवास आरोग्यधाम, रामदासपेठ येथे ही सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. दिवाकर आगरकर यांनी दिली.
येथील एका खासगी हॉटेलात यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पंचकर्माविषयी सांगताना डॉ. सुनीता निवाणे म्हणाल्या की, संपूर्ण जग वैद्यकीय तंत्रज्ञानात अग्रेसर होत असताना अयोग्य दिनचर्या, दूषित पाणी, शेतीतील रासायनिक खते फवाऱ्यांचा भडिमार, आधुनिकतेच्या ताणतणावात अतिजागरण, प्रवास, आहाराची हेळसांड, फास्ट फूड, व्यसनाधिनता आदींमुळे पोटांचे अनेक विकार निर्माण होतात. यामध्ये प्रामुख्याने अॅसिडिटी, अपचन, पोट फुगणे, मलबद्धता, छाती पोटात तीव्र वेदना आदींचा समावेश आहे. आहाराचे योग्य पचन झाल्यामुळे त्याचेच अंश मोठ्या आतड्यात साचून राहतात.

या साचलेल्या कणांचे विषाक्त द्रव्ये, चरबी आदीत रूपांतर होऊन त्याचा उपद्रव विविध त्वचा विकार, वातरोग, संधिवात, आमवात, अॅलर्जी, निद्रानाश, मानसिक विकार, तोंडाचे विकार, लठ्ठपणा, डोकेदुखी, मधुमेह, रक्त दूषित होणे, दूषित रक्तामुळे कावीळ, उच्च रक्तदाब आदींना निमंत्रण मिळते. वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्ण अशा आजारांवर अौषधे घेतो, त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो.
मात्र, पुन्हा व्याधी डोके वर काढतात. आयुर्वेदात रोगांच्या मूळ कारणांवर उपाय करत रोगांच्या मूळ उच्चाटनासाठी पंचकर्म चिकित्सा सांगितली आहे. मात्र, ती उपचार पद्धती दीर्घकालीन असल्याने अॅलोपॅथीकडे ओढा अधिक आहे. मात्र, पंचकर्म चिकित्सा औषधोपचार अत्यंत मोलाचा आहे, असेही त्या म्हणाल्या.
योगर्ट दहीचा योगिक आहार
ओमप्रकाश अग्रवाल यांनी योगर्ट दही त्यापासून बनवलेले विविध खाद्यपदार्थ यांची माहिती दिली. योगर्ट दहीचा योगिक आहार घेतल्यास चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढून पोटातील आतड्यांचे इको बॅलन्स साधून चयापचनास उपयोग होतो, असे ते म्हणाले. मुंबई, पुण्यानंतर विदर्भात कोलन हायड्रोथेरपी तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रक्रियेत ७० ते ८० लीटर पाण्याचा वापर
कोलनहायट्रोथेरपीविषयी माहिती देताना डॉ. दिवाकर आगरकर म्हणाले, पंचकर्मामध्ये विरेचन, बस्तीच्या साहाय्याने पोट स्वच्छ केले जाते. मात्र, यामध्ये मोठे आतडे साफ होत नाहीत. मात्र, आधुनिक थेरपीमुळे झिरो बॅक्टेरिया फ्री थंड गरम पाणी एका विशिष्ट दाबाने पोटात सोडले जाते. ही एक स्वयंचलित प्रणाली असून, पोटात पाणी सोडणे आतील कचरा बाहेर काढणे एका मशीनद्वारे केले जाते. एक तास चालणाऱ्या या प्रक्रियेत ७० ते ८० लीटर पाण्याचा वापर होतो. यामध्ये रुग्णाला कुठलाच त्रास होत नसून, रुग्ण सामान्यपणे उपचारानंतर दैनंदिन काम करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.