आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Colorful Fiber Glasses,Latest News In Divya Marathi

कूल लूकसाठी कलरफुल फायबर चष्म्यांची वाढली क्रेझ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरातील तरुणाईचा फॅशनेबल चष्मे वापरण्याकडे कल वाढत आहे. लाइट वेट, कलरफुल चष्म्यांची तरुणांमध्ये सध्या क्रेझ आहे. गॉगलप्रमाणेच विविध कंपनीच्या चष्म्यांमध्ये बरेच बदल झाले आहे. फॅशनच्या दुनियेत सतत काहीना काही बदल होत असतात. सध्या चष्म्यांमध्येही नवीन फॅशन आली आहे. डोळ्यांवर चष्मा लावला आहे की नाही हेसुद्धा समजत नाही, एवढे वजनाला हलके असणारे फायबरचे चष्मे आले आहेत. चष्म्याची नुसती फ्रेम फायबरची नाही तर त्याचे ग्लास पण फायबरचेच आहेत. पर्पल, रेड, पिंक, ब्लू, ग्रीन, ब्राउन, ब्लॅक, व्हाइट, ग्रे अशा विभिन्न आकर्षक रंगातील फ्रेम युवकांच्या पसंतीस उतरत आहे. ट्रान्सपरन्ट फ्रेम वापरणार्‍या तरुणांची संख्या जास्त आहे. पिंक आणि पर्पल या रंगातील विविध शेड्स मुलींना आकर्षित करत आहे.
ग्लासमध्ये काचेऐवजी सीआर फायबरचा वापर वाढत आहे. फायबर ग्लासमुळे चष्मे वजनाला हलके तर होतातच शिवाय फॅशनेबल लूकदेखील येतो. ग्लासला कोटिंग केल्यामुळे गाडीचा लाइट, उन्हाचा डोळ्यांना त्रास होत नाही. ग्लासवर मॅजेन्टा, ब्लू, गोल्डन आणि ग्रीन रंगाचे कोटिंग केले जाते. विदाउट कोटिंगचे व्हाइट ग्लासलादेखील मागणी आहे. थ्री पीस म्हणजे फ्रेमलेस, हाफ फ्रेम आणि फुल फ्रेम या तिन्ही प्रकारात चष्मे आहेत. फ्रेमलेस चष्म्यात ग्लासेसला पाहिजे तसा आकार देता येतो, त्यामुळे या चष्म्यांची अधिक क्रेझ आहे. शिवाय हे चष्मे वजनाला हलके असल्यामुळे चष्म्याच्या वजनामुळे नाकावर पडणारे डॉट्स पडत नाही. जवळपास 400 ते 1200 रुपयांपर्यंतच्या विविध डिझाइन उपलब्ध आहेत.
स्क्रॅचलेस पीसी फायबर ग्लास
पडल्यावरही तुटणार नाही, एकही स्क्रॅच पडणार नाही, असे पीसी फायबर ग्लास आले आहेत. सीआर फायबर ग्लासेस पडल्यावर फुटत नसले तरी त्यावर स्क्रॅच पडतात. पीसी फायबर ग्लासेस अनब्रेकेबल व स्क्रॅचलेस आहे. मात्र, या ग्लासची किंमत जास्त असल्याने ते फारसे वापरले जात नाही.
फोटोसन ग्लास कालबाहय़
उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून फोटोसन ग्लासेस वापरले जातात. पण, सध्या 10 टक्के तरुणाई हे ग्लासेस वापरते. त्यामुळे तरुणाईच्या जगतातून फोटोसन ग्लासेस कालबाहय़ झाले आहे. फोटोसन ग्लासपेक्षा कोटिंगचे फायबर ग्लास वापरण्याकडे अधिक कल आहे. नेहमीच्या चलनातील रंगापेक्षा ब्राइट रंगातील चष्म्याच्या फ्रेमला अधिक मागणी आहे. दोन रंगातील फ्रेम, मल्टिकलर फ्रेमलादेखील पसंती मिळत आहे. वजनाने हलके चष्मे वापरण्याकडे तरुणाईचा कल आहे.ग्लासमध्ये काचेऐवजी सीआर फायबरचा वापर वाढत आहे. ’’ गणेश इचे, चष्मा विक्रेते