आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Commissioner Dr.. Mahendra Salutary,Latest New In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातत्यातून यश नक्की- आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- उन्हाळ्याच्या सुटीत मुलांचा वेळ निर्थक गोष्टींवर वाया जातो. मात्र, सुट्यांचा सदुपयोग करून मुलांना ज्ञान देणारे उन्हाळी शिकवणी वर्गात वेळेचे महत्त्व सांगितल्या जाते. एखाद्या चांगल्या गोष्टीत जर आपण सातत्य ठेवले, तर यश नक्कीच मिळते, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. सुभाष चौकातील इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सभागृहात 21 जून रोजी झालेल्या उन्हाळी शिकवणी वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री रेणुका माता मित्र मंडळातर्फे मागील दोन महिन्यांपासून जुन्या शहरातील मांगीलाल शर्मा हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या शिबिराचा शनिवारी समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘दैनिक दिव्य मराठी’चे कार्यकारी संपादक सचिन काटे होते. या वेळी महापालिका उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, उपमहापौर रफिक सिद्दीकी, विजय देशमुख, प्रतुल हातवळणे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आयुक्त डॉ. कल्याणकर म्हणाले की, शिबिराच्या माध्यमातून मुलांमध्ये परिपक्वता आणण्याचे कार्य होते. मुलांना लहान वयात शिकवलेले भविष्यात उपयोगी पडत असल्याने या नावीण्यपूर्ण वर्गांचा सर्वांनी फायदा करून घेतला पाहिजे. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी, शिबिर म्हणजे ज्ञानदानाचं एक व्रत आहे. या शिबिरात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवामुळे आजच्या पिढीला प्रोत्साहन मिळू शकते, असे सांगितले.

‘दैनिक दिव्य मराठी’चे कार्यकारी संपादक सचिन काटे म्हणाले की, स्वत:चे सुख, समाधान शोधताना दुसर्‍यांना आनंद कसा देता येईल, याचा प्रत्येकाने विचार करावा. आपल्यातील ‘मी’ पणा बाजूला ठेवून ध्येयाचा पाठलाग करावा. दुसर्‍यासाठी काही तरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास आनंद, समाधान निश्चित मिळतो. उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत उन्हाळी शिबिरांची भूमिका महत्त्वाची असते आणि अशा शिबिरांमधूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो असे सांगितले. विजय देशमुख यांनी सामाजिक विकासासाठी असे उपक्रम आवश्यक असून, आपण त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
प्रफुल्ल हातवळणे यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षित करणे, त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून दरवर्षी विद्यार्थ्यांना विविध मार्गांनी सहकार्य करणे हे कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. दुसर्‍या वर्गातील अक्षय लहरिया याने शिबिरात खूप काही नवीन शिकायला मिळाले असून, आता दरवर्षी उन्हाळ्यात शिबिरात येणार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक डॉ. सतीश झडपे यांनी केले. संचालन अंकिता उंबरकर यांनी केले. स्पर्धेचा निकाल मेघा पाचरे, वर्षा येन्नवार, नीकिता आंबेकर, र्शिया भिडे, मंदार जोगळेकर, सोमन उंटवाल यांनी जाहीर केला, तर नंदूभाऊ जोगळेकर यांनी आभार मानले. या वेळी पुरुषोत्तम शिंदे, प्रभजितसिंग बछेर, नितीन देशमुख, मुकुंद गिरी, गौरव गिरी, कविता देशमुख, शुभम धनोकार, स्वप्निल काळे आदी उपस्थित होते.