आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Communicable Disease In Akola City People In Tension

साथीचे आजार, जनता बेजार; प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा पडतेय अपुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोल - पावसाळ्याच्या दिवसांत साथरोग आजाराची लागण दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते, हे माहिती असूनसुद्धा ग्रामपंचायतीने गावात स्वच्छतेबाबत काळजी घेतली नाही. याचा फटका गावातील सर्वसामान्य नागरिकांना बसला. जिल्ह्यातील बाळापूर, अकोट अकोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये साथीच्या आजाराने नागरिक फणफणत आहेत. आता मात्र आरोग्य विभागाने सारवासारव करत रुग्णांचा डाटा गोळा करणे सुरू केले आहे.
गावात उपलब्ध असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा रुग्णांवर उपचार करण्यात अपुरी पडत आहे. काही ठिकाणी औषधी उपलब्ध नाही, तर काही ठिकाणी डॉक्टर हजर राहत नसल्याने रुग्णांना अकोला जिल्हा रुग्णालयाशिवाय किंवा खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड तर सहन करावा लागतच आहे, शिवाय शारीरिक मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. कट्यार, वडद, कपिलेश्वर, एकलारा, दोनवाडा या अकोला तालुक्यातील गावांमध्ये नागरिक आजाराने त्रस्त झाले आहेत तसेच बाळापूर तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये व्हायरल इन्फेक्शन जोरात सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
अकोट बाळापूर तालुक्यातील गावांमध्ये डेंग्यूमुळे अनेक रुग्ण बाधित आहेत. गावात ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता नियमित होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी साचली आहे. गावात जागोजागी गटारे, घाण, कचरा साचत असल्याने नागरिकांचा जीव गुदमरत आहे.
प्रत्येक गावात सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करून नागरिकांना परिसर वैयक्तिक स्वच्छता, घरगुती उपाय, ओआरएसच्या निर्जलीकरणाच्या रुग्णांमध्ये वापर इत्यादीबाबत मार्गदर्शन प्रात्यक्षिकांसह करायला हवे होते. जिल्ह्यातील काही गावांतील लोकप्रति निधींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, गावात कुठलाही प्रकारचा कार्यक्रम घेण्यात आला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

- जिल्हा रुग्णालय -१
- उपजिल्हा रुग्णालय -
- उपकेंद्र - १७८
- प्राथमिक रुग्णालय - ३०
- ग्रामीण रुग्णालये -

कधी झाली जनजागृती?
गावातआरोग्य यंत्रणेमार्फत कुठलीही जनजागृती करण्यात आली नाही. ना कधी पाणीपुरवठ्याचे महत्त्व सांगितले ना कधी वैयक्तिक स्वच्छतेविषयी माहिती दिली. त्यामुळे ग्रामीण भागात आजार फैलावले आहेत.'' प्रवीणढोरे, कट्यार

साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न
^रुग्णालयातउपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये बाळापूर तालुक्यातील जवळपास सर्वच गावांतील रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांना सर्वतोपरी बरे करण्याचा प्रयत्न करत आहोत.'' डॉ.डिगांबर बुलबुले, वैद्यकीयअधीक्षक, ग्रामीण रुग्णालय बाळापूर. जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात साथीच्या आजाराने त्रस्त नागरिकांनी उपचार घेण्यास गर्दी केली आहे.
कुठे आहे जनजागृती? : १५मे ते १५ जूनदरम्यान आरोग्य विभागाने जलजन्य साथरोग-जनजागरण अभियान मोहीम राबवली असती तर ही वेळ आलीच नसती, अशाही प्रतिक्रिया ग्रामीण भागात उमटत आहेत.
अधिकारी अकोल्यात ठाण मांडून : जिल्हापरिषदेमध्ये स्वतंत्ररीत्या साथरोग नियंत्रण अधिकारी कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामीण भागात भेटी देणे अपेक्षित आहे. मात्र, अधिकारी डॉ. भास्कर सदणे हे जिल्हा परिषदेतच बसलेले दिसतात.
गावांमध्ये दिसते अस्वच्छता : गावातअस्वच्छता पसरली. गोदरीमुक्त गाव ही संकल्पना राबवण्यात ग्रामपंचायती अपयशी ठरत आहेत.
सीईओंनी दिल्या खबरदारीच्या सूचना
जिल्ह्यातीलतापाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला कामाला लावले आहे.
या आजाराचे रुग्ण अधिक
गॅस्ट्रो,एन्टारायटीस, कॉलरा, अतिसार या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. जुलाब, उलट्या, अंगदुखी, थंडी वाजणे, सांधेदुखी, थंडी वाजून ताप येणे यांसारखे आजार उद्भवले आहेत. या आजारांपासून आपला बचाव कसा करावा, हा प्रश्न नागरिकांना पडत आहे.