आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Communicable Disease,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साथ, आजाराचे थैमान, गावांमध्ये डबके साचल्याने डासांची संख्याही वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- साथीच्याआजाराने सर्वत्र थैमान घातले असून, संपूर्ण जिल्हाच डेंग्यूच्या डेंजर झोनमध्ये सापडला आहे. लहानसहान दवाखान्यांपासून तर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलही रुग्णांनी फुल्ल झाली आहोत. आरोग्य विभाग आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नरत असला तरी रुग्ण तसेच नातेवाइकांची मात्र चांगलीच तारांबळ उडत आहे.
मागील आठवड्यापासून पावसाने उघाड दि‍ली. पावसाचे पाणी साचल्याने जिल्ह्यातील अनेक गावात डबके साचल्याने डासांची संख्या वाढली आहे. शासकीय रुग्णालयासह अकोल्यातील आयकॉन हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, ओझोन हॉस्पिटल, सहारा हॉस्पिटलसह इतर सर्वच खासगी दवाखान्यात रुग्णांना पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती आहे. मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर मोठी वेटिंग लिस्ट आहे. रुग्णांना उपचार देताना डॉक्टर तर नाकीनऊ आलेच शिवाय रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देताना मोठी कसरत करावी लागत आहे. डेंग्यूमुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांना प्लेटलेट्सची आवश्यकता भासत आहे. प्लेटलेट्स संबंधित रक्तगट असलेल्या व्यक्तीच्या चालतात. त्यामुळे विशिष्ट रक्तगट मिळणे कठीण झाले आहे.
ऐच्छिक रक्तदात्यांनी पुढे यावे
रक्तदानानेगरजवंतांचे प्राण वाचू शकते. ऐच्छिक रक्तदात्यांनी पुढे यावे. जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदानासाठी पुढाकार घ्या.'' नीलेशजोशी, सचिव,डॉ. हेडगेवार रक्तपेढी,अकोला.
अधिका-यांना देणार सतर्कतेच्या सूचना
रुग्णालावेळेवर उपचार मिळाले पाहिजेत. डॉक्टरांनी आपल्या कामात कुठल्याही प्रकारची िदरंगाई करू नये, ज्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येईल.'' डाॅ.अविनाश लव्हाळे, उपसंचालक, आरोग्य सेवा.