आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंपनीच्या अधिका-यांसह पुरवठा विभागाचेही दुर्लक्ष, पेट्रोलपंपांवर नियम धाब्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- केंद्रशासनाच्या निर्देशानुसार पेट्रोलपंपांवर ग्राहकांना सुविधा पुरवणे गरजेचे आहे. मात्र, शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंपांवर सुविधांचा अभाव दिसून येत आहे. यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या बाबीकडे कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पुरवठा विभागाचेही दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम इण्डेन ऑइल या तीन कंपन्यांचे एकूण ६५ पेट्रोलपंप आहेत. केवळ पेट्रोलपंपांवर पेट्रोल किंवा डिझेल वितरित करणे एवढीच भूमिका पंपचालकांची नसते. तर ग्राहकाला हवा, पाणी, शौचालय, गुणवत्ता, तक्रार पुस्तक ह्या सुविधा असणे बंधनकारक आहे. यापैकी एक जरी सुविधा नसली तर पेट्रोलपंपचालकाविरुद्ध कारवाई होऊ शकते. शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक पेट्रोलपंपांवर या सुविधा केवळ नावालाच उरल्याचे दिसून येते. पेट्रोलपंपावर तक्रार दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा होणे अपेक्षित असते. मात्र, या तक्रारीकडे एरिया मॅनेजरच कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्राहकाला असुविधेबाबत तक्रार करण्यासाठी तक्रार बुक तर आहे, पण त्याचा पाठपुरावा केला जात नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

कंपन्यांचेक्रमांकही चुकीचेच :माहिती, सूचनातक्रारीसाठी प्रत्येक कंपनीचे मोबाइल दूरध्वनी क्रमांक पेट्रोलपंपाच्या दर्शनी भागावर लावण्यात आले आहेत. शहरातील एका इण्डेन ऑइलअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या पेट्रोलपंपाच्या ठिकाणी ०७१२-२५४६०५७, २५२२०९१, २५२२०९३ हे क्रमांक चुकीचे असल्याचे आढळले. याशिवाय असिस्टंट मॅनेजर म्हणून शैलंेद्र सिंह यांचा ९४२३७७४००६ हा मोबाइल क्रमांक तर बरोबर होता. मात्र, त्यांच्याकडे सध्या अकोल्याचा प्रभार नसल्याचे सांगण्यात आले.