आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे श्रेय लाटण्याकरिता "रस्सीखेच'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोणगाव - नुकतेच दहावी-बारावीचे निकाल लागले असून, गुणवंत विद्यार्थ्यांच्या फोटोसह सगळीकडे बॅनर, होर्डिंग्ज, जाहिराती झळकत आहेत. गुणवंतांनी संपादित केलेल्या गुणवत्तेचे श्रेय लाटण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील शिकवणी वर्गाचे संचालक आणि शाळा, महाविद्यालयांमध्ये ओढाताण सुरू झाली आहे. आमच्याच प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी एवढे मोठे यश मिळवल्याचा दावा शिकवणी वर्ग आणि शाळा, महाविद्यालये करत असल्यामुळे गुणवत्तेचे श्रेय अखेर कुणाचे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

गत काही वर्षांपासून शहरी भागात पसरलेले शिकवणी वर्गाचे लोण आता ग्रामीण भागात पसरले आहे. कितीही नावाजलेल्या आणि मोठ्या शाळेत पाल्य शिकत असलातरी त्याला शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) लावायचेच हा अलिखित नियम झालेला असल्याचे पाहायला मिळते.

तरशिकवणी वर्ग कशाला?
दहावी किंवा बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिकवणी वर्ग लावलेली नाही, हे क्वचितच पाहायला मिळते. विशेष म्हणजे, शाळेमध्ये तज्ज्ञ शिक्षक चांगल्याप्रकारे शिकवतात. तरीही मुलांना शिकवणी लावण्याची गरज पालकांना का वाटत आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे शिक्षकाचे लक्ष विद्यार्थ्यांकडे जात नसेल? हे जर खरे असेल तर शिकवणी वर्गांतील विद्यार्थी संख्या त्याहीपेक्षा अधिक असल्याचे दिसते. तरीही मुलाला चांगले गुण मिळावे, या आशेने आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना पालक काहीही खटाटोप करून पोटाला चिमटा देत आपल्या पाल्यांना महागडे कोचिंग क्लासेस लावत आहेत. पण, जेव्हा परीक्षेचा निकाल लागतो, तेव्हा गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय लाटण्यासाठी शिकवणी वर्ग तसेच शाळाही दावा करताना दिसतात. शेवटी यशाचे श्रेय नेमके कोणाचे, याकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही.
जमीर शहा डोणगाव
नुकतेचदहावी-बारावीचे निकाल लागले असून, गुणवंत विद्यार्थ्यांच्या फोटोसह सगळीकडे बॅनर, होर्डिंग्ज, जाहिराती झळकत आहेत. गुणवंतांनी संपादित केलेल्या गुणवत्तेचे श्रेय लाटण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील शिकवणी वर्गाचे संचालक आणि शाळा, महाविद्यालयांमध्ये ओढाताण सुरू झाली आहे. आमच्याच प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी एवढे मोठे यश मिळवल्याचा दावा शिकवणी वर्ग आणि शाळा, महाविद्यालये करत असल्यामुळे गुणवत्तेचे श्रेय अखेर कुणाचे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
गत काही वर्षांपासून शहरी भागात पसरलेले शिकवणी वर्गाचे लोण आता ग्रामीण भागात पसरले आहे. कितीही नावाजलेल्या आणि मोठ्या शाळेत पाल्य शिकत असलातरी त्याला शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) लावायचेच हा अलिखित नियम झालेला असल्याचे पाहायला मिळते.

स्पर्धेच्या काळात टिकण्यासाठी आवश्यक
कोचिंगक्लासेस लावणे हे भूषण नाही, आम्ही विद्यार्थ्यांवर मेहनत घेतो, परंतु स्पर्धेत टिकण्यासाठी कोचिंग क्लासेसकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय शाळांनाच घ्यायचे असेल तर त्यांना आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करावा लागेल. विनोदप-हाड, प-हाड क्लासेस, मेहकर.
हजारो रुपये खर्च करून पाल्याला महागडे क्लास
पालकहजारो रुपये खर्च करून आपल्या पाल्याला महागडे क्लास लावतात. दहावी, बारावीचा निकाल लागल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचे फोटो घेऊन ते होर्डिंग्जवर लावून अमुक शिकवणी वर्गाचा विद्यार्थी म्हणून आगामी वर्षासाठी पालकांनी त्यांची मुले आपल्याच शिकवणी वर्गात टाकावी यासाठी हा सगळा खटाटोप असतो , तर तिकडे शाळा, महाविद्यालयातील घटती विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता संस्थाचालकही विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षकांना दम भरतात, अशावेळी केवळ गुणवंत विद्यार्थ्यांच्या सहाऱ्याने नवीन शैक्षणिक सत्रात अॅडमिशनची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. यामध्ये शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्गामध्ये जणू काही शर्यतच लागलेली असते.
शाळा, महाविद्यालये केवळ अॅडमिशनपुरती
आजकालशहरात तसेच ग्रामीण भागातही क्लासेसचे फॅड वाढलेले आहे. शाळा किंवा महाविद्यालयात केवळ नावापुरती अॅडमिशन घ्यायची आणि शहराच्या ठिकाणी जाऊन महागडे शिकवणी क्लास लावायचे,असा खाक्या झाला आहे. पूर्वी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. आता मात्र याच शाळेत विद्यार्थ्यांची संख्या घसरली आहे. शाळांच्या भव्य इमारती, गलेलठ्ठ पगार घेणारे शिक्षक यांना आजच्या काळात निरुपयोगी ठरवले जात आहेत.
विद्यार्थ्यांचे श्रेय शाळेलाच
जीमुले ज्या शाळेत शिकली, त्याच शाळेला त्यांच्या यशाचे श्रेय जाईल. काही वर्षांपूर्वी कोचिंग क्लासेसचे फॅड ग्रामीण भागामध्ये नव्हते. तेव्हा येथील विद्यार्थ्यांना मिळालेले यश कोणाचे होते? आणि आजही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभते. चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जाते. तरीही हे यश जर कोचिंग क्लासेसचेच असेल तर वर्षभर शाळेमध्ये आम्ही काहीच प्रयत्न केले नाहीत काय. राजेंद्रआखाडे, संचालक शिक्षण संस्था, डोणगाव.
बातम्या आणखी आहेत...