आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competitive Exam Study Centre, Latest News In Divya Marathi

राज्यात सहा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-राज्यात मातंग व तत्सम समाजातील तरूणांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यातील सहा विभागात 6 निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात येत आहेत. यापैकी अमरावती विभागातील मार्गदर्शन केंद्र अकोल्यात सुरू करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी शनिवारी दिली.
दै. दिव्य मराठीच्या अकोला कार्यालयात सदिच्छा भेट देत त्यांनी संपादकीय सहकायांशी संवाद साधला. निवासी संपादक प्रेमदास राठोड यांनी त्यांचे स्वागत केले. मोघे म्हणाले, मातंग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग गठीत करण्यात आला होता. या आयोगाने केलेल्या 66 शिफारसी शासनाने तत्वत: मान्य केल्या आहेत. यापैकीच मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षांकरिता विभागीय पातळीवर 6 निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची शिफारस सरकारने अंमलात आणली आहे. सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
मात्र मातंग तथा तत्सम समाजातील युवक योग्य प्रशिक्षणाअभावी स्पर्धा परीक्षांत यशस्वी होत नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रात चार महिन्यांपर्यंत तरूणांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता नव्हे तर ती एक कला, एक तंत्र असून हेच तंत्र येथे शिकविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.