आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Candidate Arrest In Yavatmal In Blue Film Case

काँग्रेस पदाधिकार्‍याने बनवली प्रेयसीची अश्लील चित्रफीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीचा पदाधिकारी ललित गजभिये याने एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेम प्रकरणात अडकवून तिची अश्लील चित्रफीत तयार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या चित्रफितीची धमकी देऊन त्याने तरुणीच्या पालकांना दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. गेली दोन वर्षे या तरुणीला धमकी देऊन ललितने तिच्यावर अत्याचार केले. पीडित तरुणीने या प्रकरणात बुधवारी वडगावरोड पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ललितला अटक करण्यात आली.

ललित अरुण गजभिये (वय 28 वष्रे, रा. विदर्भ हाउसिंग सोसायटी) हा शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीचा सदस्य आहे. ललितने महाविद्यालयात शिकणार्‍या तरुणीला नोव्हेंबर 2011 मध्ये प्रेम प्रकरणात अडकवले. त्यानंतर तिच्या परिचयात असलेल्या एका मुलाद्वारे नोट्स देण्यासाठी तरुणीला त्याच्या घरी बोलावले. घरी कुणी नसल्याचा फायदा घेऊन ललितने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्याच वेळी त्याने तरुणीच्या नकळत शारीरिक संबंधांची अश्लील चित्रफीत तयार केली. त्यानंतर चित्रफीत सर्व मित्रांना दाखवून तुझी बदनामी करेन, अशी धमकी देत वारंवार अत्याचार केला.

गेली दोन वर्षे हा प्रकार सातत्याने सुरू होता. काही दिवसांपूर्वी ललितने त्या तरुणीकडे दहा लाख रुपये आणून देण्याची मागणी केली आणि जोपर्यंत ही रक्कम आणून देणार नाही, तोपर्यंत शारीरिक संबंध कायम ठेवावे लागतील तसेच अश्लील चित्रफीत इंटरनेटवर टाकू, अशी धमकीही दिली.

तरुणीने आपण पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा ललितला दिला. मात्र, माझे राजकीय संबंध चांगले असल्याने तू माझे काहीही करू शकणार नाही, उलट तुझीच बदनामी होईल, असा इशारा ललितने दिला. त्यामुळे तरुणी गप्प राहिली. याच दरम्यान ललितने राजू रतनकुमार गुप्ता या मुलाच्या मध्यस्थीने अश्लील चित्रफीत तयार केल्याची माहिती तरुणीच्या पालकांपर्यंत पोहोचवली. ही चित्रफीत इंटरनेटवर टाकायची नसेल तर दहा लाख रुपये द्या, अशी मागणीही त्यांच्याकडे केली. त्यानंतर तरुणीने तिच्या पालकांना घडलेली सर्व हकिकत सांगितली. पालकांनी त्वरित पीडित तरुणीला सोबत घेऊन आधी अप्पर पोलिस अधीक्षक जानकीराम डाखोरे आणि त्यानंतर वडगावरोड पोलिस ठाण्याचे ठाणेदार विपीन हसबनीस यांची भेट घेतली. आज यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणेदार हसबनीस यांनी ललित गजभियेला अटक केली. पोलिसांनी ललितविरुद्ध भादंविचे कलम 386 (खंडणी मागण्यासाठी अश्लील चित्रफितीचा वापर करणे, 376 (बलात्कार), 354 (क) (अश्लील चित्रफीत बाळगून प्रदर्शित करण्याची धमकी देणे, 67 (अ), (ब) आयटी अँक्टनुसार गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्या ललित गजभिये याला सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चंदनसिंह बयास यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्या ठिकाणी त्याची चौकशी करण्यात आली.

आतापर्यंत उकळले 45 हजार रुपये : आरोपी ललितने पीडित तरुणीला वेळोवेळी धमकी देऊन आतापर्यंत तिच्याकडून तब्बल 45 हजार रुपये उकळले. तरुणीने तिच्या पालकांना वेगवेगळी कारणे सांगून ही रक्कम ललितला नेऊन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

इतर मुलींनीही समोर यावे
या प्रकरणाची चौकशी केली असता आरोपीने असाच प्रकार इतर काही मुलींसोबतही केला असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणी फसवले गेले असल्यास पोलिसात तक्रार दाखल करावी. त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. विपीन हसबनीस, ठाणेदार, वडगाव रोड

ललितची हकालपट्टी
या घटनेची माहिती मिळताच ललित गजभियेची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश मी दिले आहेत. चंद्रशेखर चौधरी, अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी.