आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Candidate Arrest In Yavatmal In Blue Film Case

‘की चेन’च्या कॅमेर्‍याने तयार केली चित्रफीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - ‘की चेन’मधील छुप्या कॅमेर्‍याच्या साहाय्याने तरुणीची अश्लील चित्रफीत तयार केल्याची कबुली आरोपी ललित गजभियेने वडगावरोड पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीकडून सीडी, लॅपटॉप आणि कॅमेरा असलेले वाहनाचे ‘की चेन’ जप्त केले.

ललित गजभिये (वय 28 वष्रे रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळ) याला काल पोलिसांनी महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थिनीची अश्लिल चित्रफीत काढून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. गुरुवारी दुपारी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याची कसून चौकशी करण्यात आली.

वाहनाला लावण्याच्या ‘की चेन’मध्ये एक छुपा कॅमेरा असल्याचे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले. हा कॅमेरा ती तरुणी घरात आली असता भिंतीवर अडकवून अश्लील सीडी तयार केल्याचेही त्याने सांगितले. त्याने दिलेल्या माहितीवरून वडगावरोड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक मसराम यांनी पथकासह जाऊन ललित याच्याकडे असलेला तो ‘की चेन’मधील कॅमेरा जप्त केला. त्यासोबतच ललितचा लॅपटॉप आणि पीडित विद्यार्थिनीच्या अश्लील चित्रफिती असलेल्या सीडीही ताब्यात घेण्यात आल्या. ललितने याच पद्धतीचा वापर करून इतर काही तरुणींना फसवले असल्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

भाजप महिला आघाडीचे निवेदन : ललित याने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्याने केलेला प्रकार इतर कुठल्याही मुलीसोबत करण्याची हिंमत कुणी करू नये यासाठी ललितवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अशा कृत्यासंदर्भात एक उदाहरण तयार करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. त्यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.