आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress March On Sub Divisional Office For Agriculture Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी प्रश्नांवर धडकला काँग्रेसचा मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा - शेतक-यांच्यामागण्यांसाठी काँग्रेसतर्फे सोमवार, फेब्रुवारी रोजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतक-यांच्या विविध मागण्यांचे निवेदन घेऊन काँग्रेसतर्फे प्रथमच मोठी उपस्थिती असलेला हा मोर्चा तहसील ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. दुपारी वाजता मोर्चा कार्यालयावर पोहोचल्यावर विविध प्रकारच्या ३८ मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिका-यांना देण्यात आले.
महाराष्ट्रात देवेंद्र पडणवीस सरकारने अश्वासने देऊन सत्ता मिळवली. परंतु अश्वासनांची पूर्ती करण्यात आली नाही. संजय गांधी, श्रावणबाळ अशा १८७ योजनांचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप या मोर्चादरम्यान करण्यात आला. सरकारला दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यासाठी, सोयाबीन, ऊस, कापसालायोग्य भाव देण्यात या मागण्या प्रामुख्याने करण्यात आला. हा मोर्चा तहसील कार्यालयापासून निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सभा घेण्यात आली. या वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आमदार राहुल बोंद्रे, पक्षाचे नेते श्याम उमाळकर, प्रदीप नागरे यांची भाषणे झाली. या वेळी आमदार राहुल बोंद्रे यांनी सरकारवर आरोप करत सरकारची धोरणे गरीबाला आणखी गरीब बनवत असून श्रीमंताला श्रीमंत बनवत असल्याचा आरोप केला. हे सरकार व्यापारी धोरणी सरकार आहे शेतक-याच्या हिताचे नाही. वेगवेगळ्या घोषणा करून सरकार आले. मात्र, या सरकारचे अच्छे दिन कधीहा येणार याची लोक वाट पाहत आहेत, असे ते म्हणाले. सभा संपल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यामागण्यांचा समावेश : कापसालासात हजार रुपये भाव द्यावा, सोयाबीनला पाच हजार, ऊस तीन हजार, खेडेभागात कमीत कमी १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी अशा प्रमुख मागण्यांसह साखरखेर्डा तालुका तत्काळ घोषित करावा ही मागणी करण्यात आली. सध्याचे सरकार व्यापारी उद्योजकांच्या धोरणाशी संबंधित असून शेतक-यांशी त्यांना घेणे-देणे नाही. भूमी अधिग्रहण कायदा पूर्वी काँग्रेस सरकारने केला होता, तोच कायम ठेवावा, या वर्षी १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे सरकारने शेतक-यांनी २०१४ मध्ये काढलेले पीककर्ज माफ करावे, शासनाने दिलेली मदत तुटपुंजी असून, ती हेक्टरी २५ हजार करावी दोन हेक्टरपर्यंत करावी, त्याचे पैसे लवकर शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, शेतक-यांसाठी दोन हजार रुपये प्रतीमहिना पेन्शन योजना सुरू करावी, संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना प्रती एक हजार द्यावा, अंगणवाडी सेविकेचे वेतन नियमित वेळेवर द्यावे, खडकपूर्णा धरणाची उंची वाढवून त्याचे पाणी मतदारसंघातील २१८ गावांना मिळावे, जिजामाता साखर कारखाना शासनाने ताब्यात घेऊन चालवावा, पिकाची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली आहे. त्यामुळे पीक विम्याचे पैसे शेतक-यांच्या खात्यात त्वरित जमा व्हावे, सिंदखेडराजा देऊळगावराजा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनीचे काम त्वरित व्हावे, राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी विवेक घोडके यांना देण्यात आले. सिंदखेडराजा येथे काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते.

मोर्चात यांचा सहभाग
यामोर्चात आमदार राहुल बोंद्रे, श्याम उमाळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अल्काताई खंडारे, प्रदीप नागरे, अंकुश वाघ, रामदास डोईफोडे, गणेश बश्शी, अशोक पडघान, जिल्हा परिषद सदस्य अशोक पडघान, छगनराव खरात, तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे, बद्री वाघ, जगन ठाकरे, नंदु शिलवंत, महेश जाधव, अनिल सावजी, शहाजी चौधरी आदींचा मोर्चात सहभाग होता.