आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृत्तविश्लेषण: वचनपूर्ती मेळाव्यामध्ये ‘पक्षांतर’ सोहळ्यावर लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- काँग्रेसने शनिवारी येथील स्वराज्य भवनात आयोजित केलेल्या वचनपूर्ती मेळाव्याला पक्षांतर सोहळ्याचे स्वरूप येणार आहे. या मेळाव्यात कोणत्या वचनपूर्तीवर काँग्रेस नेते बोलणार, यापेक्षा कोण कोण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसमध्ये नेत्यांची संख्या वाढलेली असताना बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांच्या रूपाने भाजपचा एक अनुभवी नेता काँग्रेसला मिळत आहे. गेल्या 35 वर्षांपासून भाजपसाठी राबणारे ‘हात’ काँग्रेसच्या हातात येणार असल्याने त्याचा फायदा काँग्रेस कितपत करून घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गव्हाणकर यांच्या पक्षत्यागाने भाजपला किती फटका बसणार, हे भविष्यात दिसून येणार आहे.

वसंतराव देशमुख यांच्या पठडीत तयार झालेले नारायण गव्हाणकर यांनी पक्षाच्या आपत्तीच्या वेळी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. गेल्या 35 वर्षांच्या राजकारणात गव्हाणकरांनी अनेक माणसे जोडली आहेत. गव्हाणकरांचे संघटन कौशल्य, त्यांची निरंतर काम करण्याची शैली, कुणबी समाजाच्या उत्थानासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न याचा फायदा घेण्यात काँग्रेस पक्ष किती यशस्वी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हय़ात कुणबी आणि पाटील समाजातील वाद सर्वर्शुत आहे. या वादात एका माजी खासदाराचे महत्त्व जिल्हय़ातून संपवण्यात राबलेले हात अनेकांना ज्ञात आहे. जिल्हय़ात काँग्रेसजवळ असलेल्या मुस्लिम मतांचा गठ्ठा व गव्हाणकरांना पाठिंबा असलेल्या कुणबी समाजाचे मतदार हे लोकसभा निवडणुकीत कुठला चमत्कार घडवू शकतात का, असा प्रश्न अनेकांना आहे. दरम्यान, काँग्रेसने अद्याप नारायण गव्हाणकर यांना तसे कुठलेही आश्वासन दिले नाही. काँग्रेससाठी गव्हाणकर लोकसभेचे सक्षम उमेदवार ठरू शकतात. पण, त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांची नाराजी गव्हाणकर ओढवणार आहे. काँग्रेसमध्ये त्यांना दुसर्‍या पक्षातून आलेले नेते असे होणारे स्वागत त्यांच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात. भाजपमधून गव्हाणकरांचा काँग्रेस प्रवेश हा भाजपमधील बाळापूरसाठी इच्छुक नेत्यांसाठी पर्वणी ठरला आहे. ते या संधीचा फायदा घेण्यात यशस्वी होतात का, हे येणारा काळच ठरवणार आहे. जिल्हा परिषद, लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने भारिप-बमसंसोबत आघाडी केली असती तर त्याचा उर्वरित. पान 4

फटका स्थानिक काँग्रेस नेत्यांची ओळख पुसण्यासाठी पुरेसा होता. जिल्हा परिषद निवडणुकीत याचे दृश्य परिणाम दिसतील. या परिणामानंतर होणार्‍या लोकसभा निवडणुकीत हे चित्र अधिक स्पष्ट होईल.

बंजारा समाजाचे नेते व माजी मंत्री मखराम पवार यांचा प्रवेश भाजपसाठी डोकेदुखीचा जरी ठरणार नाही तरी तो काँग्रेससाठी निश्चितच फायदेशीर ठरणारा आहे. वाशिम व अकोला जिल्हय़ातील बंजारा समाजातील त्यांचे स्थान काँग्रेसकरिता लाभदायक ठरू शकते. मुख्यमंत्र्यांच्या मागील अकोला दौर्‍यात या समाजातील प्रा. मधुकर पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.