आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमाणींच्या बांधकामावरही महापालिकेचा हातोडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- येथील बांधकाम व्यावसायिक सोमाणी यांच्या कौलखेड येथील बांधकामावर महापालिकेने बुधवारी, 11 जून रोजी हातोडा चालवला. कौलखेड येथील जानकीलाल बन्सिलाल सोमाणी यांचे अनधिकृत बांधकाम बुधवारी दुपारी महापालिकेने पाडले. या वेळी या इमारतीच्या चारही बाजूंचे बांधकाम पाडल्याने बांधकाम व्यावसायिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. सोमाणी यांच्या बांधकामास 230.26 स्क्वेअर मीटर अर्थात 2477 स्क्वेअर फूट बांधकाम करण्याची परवानगी महापालिकेने दिली होती. असे असताना बांधकाम व्यावसायिक सोमाणी यांनी 103 स्क्वेअर मीटर अर्थात 1108 स्क्वेअर फूट अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका महापालिकेने ठेवला. या प्रकरणात त्यांना दिलेल्या नोटीसला उत्तर दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. त्यामुळे त्यांचे अनधिकृत बांधकाम व साइड माजिर्नच्या बाहेरचे बांधकाम पाडल्याचा दावा महापालिकेने केला आहे.