आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांच्या नळाला आले पुन्हा दूषित पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आठ दिवसांनंतर दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठय़ामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. यानंतर दूषित पाणीपुरवठा होणार नाही, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, गुरुवारी पुन्हा काही भागात दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांनी प्रशासनाबद्दल रोष व्यक्त केला आहे.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठा योजनेला लागलेले ग्रहण काही करता सुटलेले नाही. जलशुद्धीकरण केंद्रातील पाचपैकी तीन पंप नादुरुस्त झाले. पाच दिवसांनंतर दोन पंप दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा असताना आळंदा गावाजवळ मुख्य जलवाहिनी फुटली. या जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा शनिवारी कान्हेरीजवळ मुख्य जलवाहिनी फुटली. या सर्व प्रकारामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या सर्व प्रकारच्या दुरुस्त्या झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल, असा दावा प्रशासनाने केला. बुधवारी पहाटे जलकुंभ भरण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सोडण्यात आले. बुधवारी अनेक भागाला पाणीपुरवठा करण्यात आला, परंतु दुर्गंधीयुक्त व दूषित पाणीपुरवठा झाल्याने पुन्हा पेच निर्माण झाला. प्रशासनाने बुधवारी दिवसभर नेमका प्रकार शोधण्याचा प्रयत्न केला.
आता दूषित पाणीपुरवठा होणार नाही, अशी ग्वाहीही दिली. परंतु, पुन्हा दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे