आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कॅन्टीनमध्ये कुकरचा झाला स्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हापोलिस मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये प्रेशर कुकरचा स्फोट झाला. त्यामध्ये तीन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

पोलिस मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये स्वयंपाक सुरू होता. प्रेशर कुकरमध्ये पालकाची भाजी टाकण्यात आली होती. तीन शिट्या झाल्यानंतर प्रेशर कुकर गॅसवरून काढण्यात आला. अर्धा तास कुकर तसाच बाजूला ठेवण्यात आला होता. त्यातील हवा बाहेर काढणे आवश्यक असताना तेथील स्वयंपाकी कर्मचारी ते विसरले. कुकरचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करत असताना नरेंद्र भीमराव सुरडकर (वय ३६) यांनी प्रयत्न केला. मात्र, झाकण उघडत नसल्यामुळे त्यांच्या मदतीला संतोष गुलाबराव जाधव (वय २४) हे आले. मात्र, दोघांनीही ताकद लावून झाकण निघाले नाही. त्यानंतर त्यांनी तो कुकर आडवा करत भिंतीला लावला. या वेळी अचानक कुकरचे झाकण उघडले अन् हवेच्या दाबामुळे झाकण फेकल्या गेले. या वेळी कुकरचा मोठा स्फोट झाल्यामुळे मुख्यालयात धावपळ उडाली. कुकरमध्ये असलेली भाजी नरेंद्र सुरडकर, संतोष जाधव प्रमिला विठ्ठल घुगे (वय २५) यांच्या अंगावर उडाली. भाजी गरम असल्यामुळे त्यात तिघेही भाजल्या गेले. त्यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिघेही किरकोळ भाजल्या गेल्यामुळे उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.

स्वयंपाकी हवा
प्रत्येकपोलिस मुख्यालयांमध्ये असलेल्या मेसमध्ये प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना स्वयंपाक करावा लागतो, हे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे असे प्रकार घडतात, असे चित्र राज्यातील प्रत्येक मेसमध्ये असते. या स्फोटामुळे पोलिस दलात स्वतंत्र स्वयंपाकी ठेवण्याचा मुद्दा समोर आला आहे.