आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब... महापालिकेचा केवळ आस्थापनेवरचा खर्च ४७ टक्के

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेने २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात विकासकामात फारशी कामगिरी केली नसली तरी आस्थापना खर्चात मात्र बाजी मारली आहे. २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात मनपाचे उत्पन्न १०४ कोटी ५४ लाख ७ हजार ४५० रुपये, तर वेतनावर ३६ कोटी ८८ लाख २९ हजार ७११ रुपये खर्च झाले. शासनाच्या धोरणानुसार एकूण उत्पन्नाच्या केवळ ३६ ते ३७ टक्के आस्थापना खर्च अपेक्षित आहे. मात्र, उत्पन्नात वाढ न केल्याने महापालिकेचा आस्थापना खर्च ४६.७१ टक्के झाला आहे.

मनपा २००१ ला अस्तित्वात आली. मनपा अस्तित्वात आल्यानंतर मालमत्ता करात वाढ करण्यात आली. जकात कर आणि मालमत्ता कर हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. मात्र, प्रशासन आणि पदाधिकार्‍यांनी उत्पन्नाच्या इतर स्रोतांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असे चित्र महापालिकेत गेल्या १४ वर्षांपासून पाहावयास मिळत आहे. उपद्रव शोध व निर्मूलन, अवैध नळजोडणी, मालमत्तांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष आदी विविध उत्पन्नाच्या स्रोतांकडे लक्ष न दिल्याने आस्थापना खर्च कमी होण्यास अडचणी जात आहेत. उत्पन्न वाढल्यासच आस्थापना खर्च कमी होऊ शकतो.
उत्पन्न १०४ कोटी, तर वेतनावर झाले ३७ कोटी रुपये खर्च
उत्पन्नाकडे दुर्लक्ष : मनपाने २०१३-२०१४ या वर्षात एलबीटी, पाण्यावरील विशेष कर, परवाना शुल्क, जमिनीचे भाडे, पाण्यावरील लाभ कर आदीतून अपेक्षित उत्पन्न मनपाला मिळू शकले नाही. प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी चालू आर्थिक वर्षात जे प्रयत्न केले, ते प्रयत्न मागील आर्थिक वर्षात झाले नाही.
निवृत्तीधारकांची संख्या अधिक : महापालिकेत शिक्षक वगळता कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बरोबरीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या आहे. सेवानिवृत्तीधारकांच्या वेतनाचा खर्च महापालिकेवर पडतो. शिक्षकांच्या वेतनात ५० टक्के अनुदानाशिवाय राज्य शासनाकडून महापालिकेला वेतनासाठी अनुदान दिले जात नाही.
उत्पन्नातील लिकेज : हजारो अवैध नळजोडण्या तसेच मालमत्तांची नोंद झालेली नाही. या जोडण्या वैध तसेच मालमत्तांची नोंदणी झाली असती तर उत्पन्नात किमान १५ ते २५ कोटी रुपयाने वाढ झाली असती तसेच मनपाच्या मालकीच्या जागा कर्मचारी, व्यावसायिकांना लीजवर दिल्या आहेत.
तर आस्थापना खर्च वाढला असता : २०१३-२०१४ या वर्षात कर्मचाऱ्यांना नऊ महिन्यांचे वेतन दिले. त्यामुळे आस्थापना खर्च ४६.७१ टक्के झाला. जर १२ महिन्यांचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले असते तसेच शिक्षकांचे वेतन देण्यासाठी शासनाने या वर्षात २४ कोटी मनपाला दिले. मनपालाही एवढाच हिस्सा टाकावा लागला असता.
महापालिकेचे प्रमुख उत्पन्न
{सामान्य कर ८ कोटी ३० लाख {जकात-पथकर २४ कोटी ४ लाख {एलबीटी २१ कोटी ३ लाख {पाणीपट्टी ५ कोटी २७ लाख {गुंठेवारी विकास निधी १ कोटी २५ लाख {केबल खोदाई १० कोटी ३२ लाख {विकास शुल्क २ कोटी ४ लाख
उत्पन्नात वाढ करणार
चालू आर्थिक वर्षात उत्पन्न वाढीसाठी जे प्रयत्न झाले, ते मागील वर्षी झाले नाहीत. आताही प्रशासनाने उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने विविध प्रस्ताव महासभेकडे पाठवले आहेत. उत्पन्न वाढवल्याशिवाय शहराचा विकास तसेच आस्थापना खर्च कमी होणे शक्य नाही. या अनुषंगाने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.''
डाॅ. महेंद्र कल्याणकर, आयुक्त महापालिका अकोला.