आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका शिक्षकांच्या बदल्यांचा फुटणार पोळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनपा शाळांमध्ये अनेक वर्षांपासून चिकटून बसलेल्या शिक्षकांच्या तसेच उच्चशिक्षित असताना प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षकांच्या उच्च प्रा. शाळेत बदल्या केल्या जाणार आहेत. बदल्यांची फाइल तयार असून, आयुक्त डाॅ. महेंद्र कल्याणकर यांची स्वाक्षरी झाल्यानंतर शिक्षकांच्या बदल्यांचा पोळा फुटणार आहे.
दैनिक ‘दिव्य मराठी’ने ६ ऑगस्टला किती शिक्षक किती वर्षांपासून एकाच शाळेत आहेत, याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत, प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. नियमानुसार महापालिका शाळांमधील शिक्षकांना एकाच शाळेत पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या शाळेत बदली केली जाते. मात्र, घराजवळच्या शाळेच्या हट्टामुळे व हा हट्ट पूर्ण करण्यासाठी राजकीय दबाव तंत्राचा वापर शिक्षकांकडून होतो. त्यामुळेच महापालिकेतील ८३ शिक्षक १० ते २८ वर्षांपासून एकाच शाळेवर चिकटून बसले आहेत. एकीकडे अनेक शिक्षक एकाच शाळेत चिकटून बसले असताना दुसरीकडे बीएससी बीएड, बीए बीएड शिक्षक प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत, तर डीएड शिक्षक उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत आहे. या प्रकारामुळे आठवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असलेल्या महापािलकेच्या शाळांमध्ये तासिका होत नाही. एकच शिक्षक सर्व विषय शिकवत असल्याने वदि्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या सर्व प्रकाराकडे दवि्य मराठीने प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
बैलांच्या पोळ्यानंतर :
बैलांचा पोळा २५ आॅगस्टला आहे, तर शिक्षकांच्या बदल्यांचा पोळा २५ आॅगस्टनंतर दोन ते तीन दविसांत फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सफाई कामगारांच्या बदल्यांना मोठा विरोध झाला होता. आता शिक्षक बदल्यांचा स्वीकार करतात की राजकीय दबाब तंत्राचा वापर करतात? याबाबत महापािलकेत चर्चा सुरू आहे.