आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corrupt Gramsevak Shridhar Lonangre Caught By ACB

लाचखोर ग्रामसेवक ‘एसीबी’च्या जाळ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला, (बाळापूर)- कौटुंबिक स्थावर मालमत्तेच्या वाटणीची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाळापूरमध्ये शुक्रवारी दुपारी रंगेहात पकडले. रमेश हरिभाऊ मेसरे (रा. मनारखेड ता. बाळापूर)यांच्या वडिलांच्या नावावरील घराच्या वाटणीची नोंद त्यांच्यासह तीन भावांच्या नावे करायची होती. त्यासाठी बाळापूरचा ग्रामसेवक र्शीधर लोणाग्रे याने पाच हजार रुपयांची मागणी केली. रमेश मेसरे यांनी या संदर्भात अकोल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पंचासमोर ग्रामसेवक र्शीधर लोणाग्रेला जयस्तंभ चौकातील चहाटपरीवर पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक आर. एस. तडवी यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक र्शीकांत कंकाळ, पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, गाडगे, महल्ले, काळे, फुलकर, कश्यप आदींनी केली.

30 जूनला होती सेवानिवृत्ती
ग्रामसेवक र्शीधर लोणाग्रे 30 जून 2014 ला सेवानिवृत्त होणार होता. मात्र कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना गजाआड केले.