आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cotton News In Marathi, Farmer, White Gold, Divya Marathi, Akola

‘पांढर्‍या सोन्याची’ खरेदी थांबली,हजारो क्विंटल कापूर शेतक-यांच्या घरात पडून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शासकीय यंत्रणेमार्फत कापसाची खरेदी मागील तीन महिन्यांपासूनच बंद करण्यात आली आहे. त्यात व्यापार्‍यांनीही कापसाची खरेदी बंद केली आहे. त्यामुळे हजारो क्विंटल कापूस शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापसाला मागणी नसल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.


जिल्ह्यातील 40 टक्के शेतकरी कापसाचा पेरा करतात. या वर्षी 27 हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी खरिपात कापसाचा पेरा केला. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कापसाची वेचणीसुद्धा पूर्ण झाली. त्यानंतर रब्बी हंगाम लागला. ज्या शेतकर्‍यांकडे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, अशा शेतकर्‍यांनी कापसाला पाणी दिले. त्यामुळे फरदडीचा कापूस चांगला झाला. सध्या फरदडीचा कापूस मोठय़ा प्रमाणात येत आहे. साधारणपणे एका शेतकर्‍याला एकरी 4 ते 7 क्विंटल कापूस मिळत आहे. मात्र, कापूस भाववाढीची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. कापसाचा भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांच्या घरात कापूस पडून आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.


कापूस फे डरेशनची खरेदी बंद
कापूस फेडरेशनने तर कापूस खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना व्यापार्‍यांशिवाय पर्याय नाही. व्यापार्‍यांनीही सद्य:स्थितीत कापसाची खरेदी थांबवली आहे. त्यामुळे कापसाची विक्री कुठे करावी, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. शेतकर्‍यांची निकड पाहून शासकीय खरेदी केंद्रावर कापसाची खरेदी सुरू राहणे आवश्यक होते.
मात्र, भाव केवळ 3900 ते 4000 रुपये प्रतिक्विंटलच्या जवळपास आहे. जिल्ह्यातील एकाही कापूस फे डरेशनची खरेदी सुरू नसल्याचे दिसते.