आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी खरेदी रखडल्याने व्यापाऱ्यांकडून लूट सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कापसाचे उत्पादन यंदा घटल्याने आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आता कापसाच्या भावासाठी संघर्ष करावा लागत आहे. कापसाचे भाव स्थानिक बाजारपेठेत सरकारी खरेदीदार नसल्याने तब्बल पाचशे ते हजार रुपये प्रती क्विंटलने घसरले आहेत. त्यामुळे याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी घेणे सुरू केले आहे. नाफेडचा एजंट महाकॉट सीसीआयमार्फत राज्यात कापूस खरेदी मुहूर्त कधी लागणार, अशी ओरड सुरू झाली आहे.
गेल्या वर्षी प्रती हेक्टरी कापसाचे उत्पादन हे १२ ते १५ क्विंटल इतके जमिनीचा पोत पाहून झाले. यंदा मात्र, ते निम्म्यावर आले आहे. त्यामुळे आधीच हाताशी पीक नाही आलेल्या पिकाला भाव द्यायला सरकार खरेदी एजन्सी तयार नाहीत, अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांसमोर अडचण असल्याने त्याचे सोने करण्यात काही व्यापारी गुंतले असून, यासाठी परप्रांतातील व्यापाऱ्यांनी येथे ठाण मांडले आहे. शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम रोख स्वरूपात देत ते कापूस खरेदी करत आहे. अगदी थेट शेतकऱ्यांच्या घरातून कापूस उचलण्याचा उद्योग या खासगी व्यापाऱ्यांचा आहे. पण, या माध्यमातून व्यापारी जे भाव सांगतील त्या भावात शेतकरी कापूस विकत आहेत.

यंदा शेती उत्पादन उत्पन्नात घट झाल्याने मिळेल त्या भावात कापूस िवकण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर आली असून, शासनाने त्वरित शासकीय खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांद्वारे व्यक्त केली जात आहे.

कापूसखरेदीचा घोळात घोळ
कापूसखरेदी करण्यासाठी कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयला केंद्र शासनाने िनर्देश दिले आहेत. त्यामुळे एकप्रकारे बाजारपेठेत किमान आधारभूत किमतीत कापूस खरेदी करण्यास व्यापाऱ्यांना इतरांना भाग पडेल अशी रणनीती केंद्र सरकारने आखली होती. पण, तिची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. महाकॉट अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ कापूस खरेदीबाबत अद्याप कुठलीही भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यांना राज्य शासनाने तीस कोटींचे कर्ज मंजूर केले. पण, कापूस खरेदी केंद्राचे काय, ग्रेडर, तोलाई करणारे आणि गोडाउन उपलब्ध होईस्तोवर ते सुरू होणे नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

अच्छे दिनची किंमत पन्नास रुपये
गेल्यावर्षी मध्यम लांबीच्या धागा असलेल्या कापसाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी ) प्रती िक्वंटल ३७०० रुपये इतकी होती. यंदा अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या केंद्र सरकार केवळ पन्नास रुपये प्रती क्विंटलने वाढवले. त्यामुळे यंदा कापसाची किमान आधारभूत किंमत ही केवळ ३७५० रुपये मध्यम लांबीच्या धाग्याच्या कापसासाठी झाली आहे.