आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात केवळ 4600 रुपये भाव; कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कापसाची खरेदी थांबल्याने व कापसाला केवळ 4600 रुपये भाव मिळत असल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यात कापसाचा पेरा 96 हजार हेक्टरवर झाला आहे. खरिपाचा पेरा सर्वाधिक होऊनही कापसाची आवक मात्र घटलेली दिसून येत आहे. साधारणपणे दिवाळीनंतर कापसाची आवक वाढते. मात्र, सध्यातरी चित्र उलटेच दिसत आहे. शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या फेडरेशनच्या केंद्राकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे, तर खासगीतही कापसाची फारशी विक्री होत नसल्याचे चित्र आहे. मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना कापसापासून फार अपेक्षा होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात ऐन वेचणीच्या वेळी आलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळवले. पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कापसाच्या उत्पादनावरही चांगलाच परिणाम झाला. त्यातच आता अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.


करायचे तरी काय ?
पांढर्‍या सोन्याची किंमत घसरली आहे. त्यामुळे अल्प किमतीत कापूस कसा विकायला काढावा ? रवी पाटील, शेतकरी

फेडरेशनचे केंद्र बंद
जिल्ह्यात फेडरेशनचे 11 केंद्र असून, यापैकी केवळ दोनच केंद्र कार्यान्वित आहेत. या दोनमध्ये अकोट आणि आपातापा येथील केंद्राचा समावेश.

खासगी जिनिंगही बंदच
जिल्ह्यात 10 ते 12 जिनिंग प्रेसिंग आहेत. मात्र, सद्य:स्थितीत अकोल्यातील र्शद्धा जिनिंग, पारस येथील माउली जिनिंग व बोरगावातील अजमेरा जिनिंग कार्यान्वित आहेत. याव्यतिरिक्त असलेल्या सर्व जिनिंग बंद अवस्थेत आहेत.

केवळ 4500 रुपये भाव
कापसाला काही काळापूर्वी साधारणत: सात हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत असे. सद्य:स्थितीत मात्र 4500 ते 4600 रुपये भाव मिळत आहे.