आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक रामटेके हल्ला प्रकरण, दोन आरोपींना केली पुण्यातून अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजय रामटेके यांच्यावर जुलै २०१४ रोजी गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी महिनाभरातच अटक केली होती. त्यातील दोन आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाले होते. मात्र, १० महिन्यांनंतर सोमवारी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्याहून ताब्यात घेऊन त्यांना अटक केली.
अजय रामटेके हे जुलै २०१४ रोजी मुंबईहून हावडा मेलने सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अकोला रेल्वेस्थानकावर उतरले होते. त्यानंतर ते घरी जाण्यासाठी ऑटोने जात असताना त्यांच्यावर रामदासपेठमधील दामले चौकाजवळ देशी कट्ट्यातून गोळीबार केला होता. त्यानंतर हल्लेखोरांनी दामले चौकात त्यांचा ऑटो अडवून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. त्यात त्यांचा एक हात तोडल्या गेला. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. त्यापैकी पोलिसांनी शेख मोहसीन, सागर सरोदे, संतोष उर्फ भद्या वानखडे अजय ठाकूर यांना अटक केली होती, तर सुरेश अरुण पांडे आणि शुभम संजय गोलाईत यांचाही या हल्ल्यात समावेश असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता.
माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मे रोजी पुण्याला पोहोचले. तेेथे एका हॉटेलमधून सुरेश पांडे शुभम गोलाईत या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस सोमवारी सकाळी अकोल्यात घेऊन आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई नंदकिशोर नागलकर, मोहोळ, हसन मंगेश नागरे यांनी केली आहे.

लोकेशन बदलामुळे...
या दोन्ही फरार आरोपींचा शोध घेतला असता ते नेहमी लोकेशन बदलवत असल्यामुळे पोलिसांच्या हाती येत नव्हते. स्थानिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास गेल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांना हे दोन आरोपी पुण्यात असल्याची माहिती मिळाली होती.