आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटांचा बँका घेणार शोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सन 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याने त्या बँकेत बदलून मिळणार आहेत़. त्यासोबतच बँकांद्वारे बनावट नोटांचादेखील शोध घेतला जाणार आहे. बदलण्यासाठी आलेल्या नोटांपैकी एखादी नोट बनावट निघाली, तर बँक ती ताब्यात घेईल. मात्र ती बदलून देणार नाही. त्यामुळे ग्राहकांकडे चुकीने जरी बनावट नोट आल्यास त्यांना आपल्या कष्टाच्या पैशावर पाणी सोडावे लागणार आहे.

सध्या बनावट नोटा बाजारात असल्याने एखाद्या खरेदीत लोकांच्या हाती अशी बनावट नोट ठेवली जाऊ शकत़े. ही नोट बनावट असल्याचे न समजल्याने अशा नोटांच्या आधारावर व्यवहार केले जात आहेत़ पण, एखादी व्यक्ती सन 2005 पूर्वीची नोट बदलण्यासाठी बँकेत गेली आणि ती नोट बनावट असल्याचे बँकेला आढळले तर ती नोट चलनातून बाद होईलच. पण, ती बनावट असल्याने त्याला कोणतेही मूल्य नसल्याने त्या बदल्यात बँक नवी नोट देणार नाही़

चलनात बाद झालेल्या नोटा
चलनात असलेल्या 1 हजार आणि 10 हजार रुपयांच्या नोटा सन 1946 मध्ये काढून घेण्यात आल्या़ सन 1954 मध्ये 1 हजार, 5 हजार आणि 10 हजाराच्या नोटा पुन्हा चलनात आणल्या गेल्या आणि त्या सन 1978 मध्ये पुन्हा काढून घेण्यात आल्या.

नोटा बाद का केल्या जातात?
वापरामुळे नोटा खराब होतात, फाटतात. व्यवहारातून बाद कराव्या लागतात. अशा नोटा ,नाणी रिझर्व्ह बँकेत परत करता येतात.सुरक्षेच्या कारणांसाठीही नोटा बाद केल्या जातात.2005 पूर्वीच्या नोटा बाद करण्याचा निर्णयही त्याचसाठी घेतला.


विशिष्ट प्रकारचा उभा धागा
‘काळ्या पैशा’वर नियंत्रणासाठी 1000, 500 रुपयांच्या नोटाच नव्हे, तर 100 च्या नोटाही बाद कराव्या
78 टक्के जनता दिवसाला 20 रुपयेच खर्च करते, तर अधिक मूल्याच्या नोटा हव्यात कशाला?
या नोटा बाद केल्या, तर बनावट नोटा बनवणे अशक्य होईल. 1000, 500 च्या बनावट नोटांची निर्मिती तुलनेत कमी खर्चीक. त्यामुळेच चलनात बनावट नोटा येतात.
धनादेश, धनाकर्ष, ऑनलाइन ट्रान्झ्ॉक्शन्स केल्यास ‘काळा पैशा’वर मात होईल.