आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महसूल: मालमत्तांची मोजणी दोन दिवसांमध्ये होणार पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेच्या दक्षिण झोनमधील मालमत्तांच्या मोजणीचे काम दोन दिवसात पूर्ण होणार आहे. त्यानंतर पूर्व झोनमधील मालमत्तांच्या मोजमापाला गती दिली जाणार आहे. तीन महिन्यात मालमत्तांचे मोजमाप पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेने रिअसेसमेंट केलेले नव्हते. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झालेली नव्हती. ही बाब लक्षात घेऊन फेब्रुवारी महिन्यात रिअसेसमेंटला प्रारंभ करण्यात आला. रिअसेसमेंटला दक्षिण झोनपासून प्रारंभ करण्यात आला. दक्षिण झोनमधील सिंधी कॅम्पपासून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. दक्षिण झोनमधील मालमत्तांच्या मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ज्या मालमत्तांना कुलूप होते, अशा मालमत्तांचे मोजमाप आता राहिले असून, या मोहिमेमुळे दक्षिण झोनमधील सात ते दहा हजाराने मालमत्तांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे. येत्या दोन दिवसात म्हणजेच ३० मेपर्यंत दक्षिण झोनमधील मालमत्तांचे मोजमाप पूर्ण होईल. त्यामुळे यापूर्वीच सुरू करण्यात आलेल्या पू‌र्व झोनमधील मालमत्तांच्या मोजणीला गती मिळणार आहे. पूर्व झोनमधील मालमत्तांचे मोजमाप झाल्यानंतर उर्वरित झोनमधील मालमत्तांचे मोजमाप घेतले जाणार आहे.
या मोहिमेमुळे मालमत्ता कराच्या उत्पन्नात पाचपटीने वाढ होण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे. मागील दोेन दिवसात मालमत्ता मोजणी पथकाने एकूण ८४० मालमत्तांचे मोजमाप पूर्ण केले आहे. तर, आतापर्यंत ३० हजार मालमत्तांना नवीन क्रमांक देण्यात आला आहे.
जी आय एसचे काम केले कर्मचाऱ्यांनी : जीआयएसप्रणालीचा फायदा महापालिकेला विविध योजनांसाठी मिळणार आहे. परंतु, जीआयएस प्रणाली लागू करण्यासंदर्भात अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांमध्येच एकमत नाही. परंतु, आज ना उद्या जीआयएस प्रणाली लागू करावी लागणार आहेच. मात्र, ही प्रणाली लागू होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांनीच या प्रणालीचे काम केले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अमरावती महापालिकेनेही घेतला आदर्श...
बातम्या आणखी आहेत...