आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या राजकारणात डावे पक्ष पुन्हा उसळी घेतील, भाकपचे ज्येष्ठ नेते खासदार डी. राजा यांना विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- देशातील जनता सध्या एका वेगळ्या विचारांच्या प्रभावाखाली असली, तरी भविष्यात डावे पक्ष पुन्हा एकदा उसळी घेतील. त्यासाठी देशभरातील डाव्या पक्षांच्या एकत्रीकरणावर आमचा भर असल्याची माहिती भाकपचे ज्येष्ठ नेते खासदार डी. राजा यांनी नागपुरात बोलताना दिली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या(भाकप) राष्ट्रीय परिषदेची बैठक नागपुरात सुरू आहे. मार्चमध्ये पाँडेचेरी येथे आयोजित होणाऱ्या भाकपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी नागपुरात ही बैठक सुरू असून, पक्षाचे सर्व केंद्रीय नेते त्यात सहभागी झाले आहेत. निवडणुकीतील पराभवाचे गंभीर चिंतन पक्षाने केले असून, येत्या काळात लोकाभिमुख विचारांच्या माध्यमातून डावे पक्ष पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात उसळी घेतील, असा विश्वास राजा यांनी व्यक्त केला. त्यासाठी देशातील सर्व डाव्या पक्षांच्या एकत्रीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसप्रमाणेच केंद्रातील मोदी सरकारने कार्पोरेटला अनुकूल धोरण राबवून देशाचे अर्थकारण उद्योगपतींच्या घशात घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मोदी सरकारमुळे संघ परिवारातील संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिंदू इस्लामी असा दोन्ही प्रकारचा कट्टरतावाद देशासाठी घातक ठरत आहे. जबरदस्तीचे धर्मांतर जबरदस्तीची घर वापसी या दोन्ही बाबी चुकीच्या असल्याचे राजा म्हणाले. नागपुरात सुरू असलेल्या या तीन दिवसीय बैठकीचा समारोप उद्या रविवारी होणार आहे.