आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Accused Akashay Said He Killed To Lado, Divya Marathi

लाडोच्या रडण्याने भांबावलो, गळा आवळून केली हत्या - आरोपी अक्षय पुरोहितची कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा- ‘लाडोच्या अपहरणानंतर घटनास्थळाच्या परिसरात झालेली लोकांची गर्दी आणि त्यातच लाडोच्या रडण्याने पकडल्या जाण्याच्या भीतीने भांबावून लाडोच्या कपड्यांनीच तिचा गळा आवळून हत्या केली,’ अशी कबुली या प्रकरणातील आरोपी अक्षय पुरोहित याने रविवारी पोलिसांसमोर देत घटनाक्रमाची माहिती दिली.
लाडो उर्फ विशाखा सागर बागाणी हत्याकांडातील आरोपी अक्षय पुरोहित यास पोलिस कोठडीदरम्यान पोलिसांनी बोलते केले. 27 फेब्रुवारी रोजी गुरुवारी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सागर बागाणी यांची एकुलती एक मुलगी लाडो हिचा घरकाम करणार्‍या अक्षय दत्ता पचांगे (वय 19 वर्षे) रा. तेल्हारा या नोकराच्या मदतीने अपहरणाच्या वेळी अक्षय पचांगेला दुसर्‍या आरोपीने मारण्याचा बनाव केला. लाडोचे अपहरण करून खंडणीच्या स्वरूपात मोठी रक्कम उकळण्याचा त्यांचा उद्देश होता.
अपहरणानंतर लाडोला घेऊन डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयामागील शेतात दबा धरून बसलो, असे या आरोपीने सांगितले. लाडो रडत होती. शांत करण्यासाठी तिला शेतातील हरभर्‍याचे दाणे खाऊ घातले. अपहरणानंतर तब्बल दोन ते अडीच तासांनंतर शंभर ते दीडशे नागरिक दुचाकी घेऊन डॉ. खेडकर महाविद्यालयाजवळ थांबले. त्या मुलीचा शोध सुरू झाली. या ठिकाणी आलेल्या लोकांच्या भावना तीव्र होत्या. लाडोच्या रडण्याचा आवाज जर या लोकांपर्यंत गेला तर आपण पकडले जाऊ, या भीतीने भांबावून गेलो. लाडोचे तोंड दाबून तिच्या अंगावरील कपडे काढले. नंतर तेच कपडे तिच्या तोंडात कोंबून कपड्याच्या नाड्याने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाला मातीखाली झाकले, अशी कबुली अक्षय पुरोहितने पोलिसांना दिली. या घटनेतील दुसरा आरोपी अक्षय पचांगे मात्र अद्याप काही बोललेला नाही. या प्रकरणात लाडोला अपहरणानंतर गुंगीचे औषध दिले काय, तिची हत्या केव्हा केली, या सर्व बाबी शवविच्छेदनानंतर समोर येतील.
फास्ट ट्रॅक कोर्टमधून शिक्षा द्या
लाडोची हत्या करणार्‍या त्या आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टमधून शिक्षा द्या, अशी मागणी आमदार डॉ. रणजित पाटील यांनी केली. रविवारी त्यांनी बागाणी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी पोलिस निरीक्षक अनंत निकम यांच्याकडून माहिती घेतली.