आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Divya Marathi, Youth Murder, Akola

लहान उमरीत तरुणाचा खून, दुसरा गंभीर जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - किरकोळ वादातून सात ते आठ जणांनी मिळून धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री बाराच्या सुमारास लहान उमरीतील अष्टविनायक नगरमध्ये घडली.मंगेश रमेश बावणे (वय 24, रा. अष्टविनायक नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मंगेश आणि त्याचा एक बहादुरे नावाचा मित्र हे दोघे दारुच्या नशेत तर्र होऊन अष्टविनायक नगरात आले. तेथे सात ते आठ जण उभे होते. मंगेश आणि त्याचा साथीदार दारुच्या नशेत काहीबाही बरळत होते. या लोकांनी त्यांना हटकले असता, त्यांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यावरुन आरोपींनी प्रथम दोघांना मारहाण केली. नंतर हे प्रकरण वाढत गेले. वाद विकोपाला जाऊन सदर सात ते आठ जणांनी पाईप आणि चाकूने दोघांवरही हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. मंगेशला सवरेपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर त्याचा मित्र बहादुरे जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.


घटनेची माहिती मिळताच सिव्हील लाईन्स पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही जखमींना सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी बहादुरे नावाच्या एका इसमास ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत पोलिसांची चौकशी प्रक्रिया सुरु होती.