आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Five People Tying To Murder At Akola, Divya Marathi

दुकानाच्या वादातून व्यापार्‍यावर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- किराणा बाजारातील एका व्यापार्‍यास दुकान खाली करण्याच्या वादातून पाच जणांनी खंजीर मारून जखमी केले. ही घटना शुक्रवारी 21 फेब्रुवारीला सायंकाळी 6.30 वाजता घडली. याप्रकरणी किराणा व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किराणा बाजारात सिंधी कॅम्प येथील किशनचंद दर्यानोमन आहुजा (54) यांच्याशी सदानंद बापूराव साखरकर यांचा वाद झाला. सदानंद साखरकर याने दुकान खाली कर, असे म्हणून किशनचंद आहुजा यांच्याशी वाद घातला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या वेळी सदानंद साखरकर आणि त्याचे चार सोबती यांनी किशनचंद आहुजा यांच्या दोन्ही हातावर खंजीरने वार केले. त्यात आहुजा जखमी झाले. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी सदानंद साखरकर आणि अन्य चार जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.