आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Mobile Theft Issue At Akola, Divya Marathi

मोबाइल शॉपीतून मोबाइलची चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील रतनलाल प्लॉटमधील साउंड वर्ल्ड मोबाइल शॉपीतून एका चोरट्याने अँपल कंपनीचा मोबाइल फोन चोरून नेला. ही घटना शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. अज्ञात चोरट्याविरोधात सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात शुक्रवारी 28 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात केलेल्या तक्रारीनुसार 15 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान दुकानात गर्दी असल्याचे पाहून चाजिर्ंगवर लावलेला अँपल कंपनीचा 25 हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी मोबाइल शॉपीचे मालक प्रशांत गहले यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.