आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या वादातून हत्या प्रकरणातील आरोपींना १६ डिसेंबरपर्यंत कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जुन्याशहरातील नबाबपुरा येथील एका गुंड प्रवृतीच्या व्यक्तीला दारूच्या दुकानावर चार जणांनी सोमवारी रात्री १०.३० वाजता बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला होता. या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेशदिले आहेत.

रऊफ खान सलीम खान (वय ४२ वर्षे) हा सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास जुने शहरातील पोळा चौकामध्ये दारू पिण्यासाठी गेला होता. या वेळी दारू पिण्यावरून
त्याचा तेथे उपस्थित असणा-यासोबत वाद झाला. या वेळी रऊफ खान सलीम खान याला मारहाण करण्यात आली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने मारेक-यांनी त्याला
लोणी रस्त्यावर नेऊन टाकले होते. दुस-या दिवशी शिवसेना वसाहत येथील एका युवकाला तो पडलेल्या स्थितीत दिसला. त्याने जुने शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी रऊफ खान सलीम खान यास रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. या वेळी मृतकाची पत्नी आणि त्याचा मुलगा यांनी पोिलसांच्या मारहाणीमध्ये आपल्या पित्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. पोिलसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी दोन आरोपींना अटककेली होती, तर अन्य दोघांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यामध्ये नटवरलाल मदनलाल अहिरे (वय ३६ वर्षे), सागर ओकांर डोंगरे (वय २२ वर्षे), संतोष अभिमन्यू वाडेकर (वय २८ वर्षे), कुंदन किशोर पटेल (वय ३२ वर्षे) या चौघांचा समावेश आहे.

या चारही आरोपींना गुरुवारी िसटी कोतवाली पोिलसांनी न्यायाधीश एस. एस. जांभळे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांच्या न्यायालयाने १६ डिसेंबरपर्यंत चारही आरोपींना पोिलस कोठडीत ठेवण्याचे आदेशदिले आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. राजेश अवसाल, तर आरोपीतर्फे अॅड. केशव एच. िगरी, अॅड. रिना यादव, अॅड. पूजा सप्रे आणि अॅड. एल. बी. देहलीवाला यांनी काम पाहिले.