आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस बंदोबस्तामध्ये आरोपींना परीक्षेची परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नवोदय वदि्यालयातील ४९ मुलींच्या विनयभंगप्रकरणी दोन आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना ११ एप्रिलला दिल्लीला प्राचार्यपदाच्या परीक्षेला जाण्याची परवानगी दिली. पोलिस बंदोबस्तात परीक्षेला घेऊन जाण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तथापि, दोन्ही आरोपींनी परीक्षेसाठी जाण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

आरोपी शिक्षक राजन गजभिये आणि शैलेश रामटेके यांच्यावर विनयभंगाचे आरोप आहेत. सध्या हे दोघे १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. मात्र, त्यांची प्राचार्यपदाची परीक्षा दिल्ली येथील जवाहर नवोदय वदि्यालयात असल्यामुळे त्यांनी बुधवारी अकोला येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात परीक्षेला जाण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, तुम्ही पोलिस कोठडीत असल्यामुळे तुम्हाला परवानगी देता येणार नाही, असा अादेश देऊन त्यांची याचिका खारीज केली होती. त्याला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती ए. बी. चौधरी आणि टी. एन. देशमुख यांच्या न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यांना पोलिस बंदोबस्तात दिल्लीला परीक्षेसाठी घेऊन जाण्याचे आदेश दिले. यादरम्यान जो खर्च येईल तो आधी सरकारने उचलावा आणि दोन आठवड्यांच्या आत तो खर्च आरोपीने द्यावा, असेही न्यायालयाने म्हटले. या आदेशाची एक प्रत सरकारी वकिलाच्या माध्यमातून सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात धडकली. गुरुवारी संध्याकाळी आरोपीच्या वतीने अॅड. प्रवीण वाठोर, अॅड. संजय उपर्वट यांनी काम पाहिले.

आज संपणार कोठडी
आरोपीराजन गजभिये, शैलेश रामटेके आणि त्यांना मदत करणारा नागपूर येथील आणखी एका आरोपीच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार आहे. जर आरोपींना पोलिसांनी परीक्षेला नेले नाही, तर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.