आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सडेतोड: सुटाबुटातील सरकार म्हणण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर)
अकोला- पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान असताना त्यांचे सूट कुठे धुण्यासाठी आणि इस्त्रीसाठी जात होते, हे अख्खा देशाला माहीत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सुटाबुटातील सरकार म्हणण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला आणि गांधी घराण्याच्या नेत्यांना नाही, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी केली. ते गुरुवारी कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते.
६० वर्षांमध्ये काँग्रेसने देशाची वाट लावली. आता भाजपचे सरकार सकारात्मक दिशेने काम करत असताना विरोधक विरोधासाठी विरोध करत आहेत. राहुल गांधी मोदी सरकारला सुटाबुटातील सरकार म्हणत असतील तर त्यांनी आधी आपल्या कुटुंबीयांच्या राहणीमानाचे एकदा आकलन करावे. राजीव गांधी पंतप्रधान असताना १० लाखांचा पेन ते सही करण्यासाठी वापरत असत, राहुल गांधी स्वत: ५० हजार रुपयांचा बूट घालतात. त्यामुळे त्यांना सूटबूटची सरकार म्हणण्याचा अधिकार नाही. विदेशातून भारतात आलेल्यांनी नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर बोलू नये, असेही पात्रा म्हणाले. त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची खिल्ली उडवत, पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा पाढा वाचून, एक सक्षम पंतप्रधान देशाला मिळाल्याचे सांगितले. खासदार संजय धोत्रे, महापौर उज्ज्वला देशमुख, आमदार हरीश पिंपळे, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, भाजपचे महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, जगन्नाथ ढोणे उपस्थित होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...पाच मजली इमारतीचा पाया मजबूत...
बातम्या आणखी आहेत...