आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्ज फसवणूक प्रकरण: एजंट टोळीचा म्होरक्या कोतवाली पोलिसांच्या रडारवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पीक कर्ज फसवणूक प्रकरणातील एजंटांच्या टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या रडारवर आहे. या म्होरक्यासोबत त्याचा आणखी एक साथीदार असल्याने पोलिस या दोघांचाही शोध घेत आहेत. देना बँकेमार्फत वितरण करण्यात आलेल्या पीक कर्जामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. या तक्रारीची तहसील कार्यालयाने चौकशी केली. चौकशीअंती नायब तहसीलदार चरणदास कोवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी पोलिसांनी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र महादेव गुन्नाडे आणि कृषी अधिकारी कपिल नादर पटेल यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला

पथक नाशिकला रवाना : देना बॅँकेचे तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र महादेव गुन्नाडे यांच्या अटकेसाठी शहर पोलिस ठाण्याचे पथक नाशिकला रवाना झाले आहे. पोलिसांनी गुन्नाडेच्या घराचा शोधला आहे.

आणखी एकास अटक : पोलिसांनी कमलेश यादव या आरोपीला अटक केली; मात्र त्यांची आणि प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. तसेच पोलिस कोठडीत असलेला आरोपी राजू माने यालाही रुग्णालयात भरती करण्यात आले.