आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cultural News In Marathi, Akshy Trutiya Issue, Divya Marathi

अक्षय्य तृतीये’ला सोने खरेदीस पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व असून, या दिवशी सोने, चांदीची खरेदी नागरिकांकडून केल्या जाते. त्यानुषंगाने येथील सराफा बाजारात विविध डिझाइनच्या दागिन्याचे आगमन झाले आहे.
हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जातो. तसेच हा दिवस विवाहासाठीदेखील उत्कृ ष्ट मुहूर्त समजल्या जातो. विविध समारंभाप्रमाणेच अक्षय्य तृतीयेचा दिवसदेखील साजरा करण्यात येत असून, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने व चांदीच्या दागिन्यांची खरेदी मोठय़ा प्रमाणात केली जाते. यानुषंगाने शहरातील सराफा बाजारामध्ये विविध प्रकारच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे आगमन झाले आहे.
तसेच अक्षय तृतीयेला कुटुंबातील पूर्वजांचे पूजन करण्यात येत असल्याने त्यांच्यादेखील प्रतिमा करून घेतल्या जातात. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसोबतच या प्रतिमांचीसुद्धा खरेदी केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर महिलांसाठी खास टेम्पल ज्वेलरी, पारंपरिक लक्ष्मीहार, बकुळी हार, चपळा हार, मोहन माळ, राणी हार आदी दागिन्यांनी सराफा बाजार सजला आहे. या दागिन्यांना फॅशनेबल टच देण्यात आला असून, महिला वर्गाचे याकडे खास आकर्षण वाढत आहे. अक्षय तृतीयेला विवाहाचादेखील मुहूर्त असल्याने यंदा ग्राहकांची गर्दी वाढणार असल्याचे संकेत आहेत.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणार गर्दी
सध्या लग्नसमारंभाचा कालावधी सुरू असल्याने ग्राहकांची चांगलीच गर्दी वाढलेली आहे. सोबत साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजल्या जाणारा अक्षय्य तृतीयादेखील येत असल्याने ग्राहकांची गर्दी वाढणार असल्याचे संकेत आहेत. वाढणारी गर्दी पाहता अनेकांनी आधीच ऑर्डर दिली आहे. शॉर्ट मंगळसूत्र, चपळा हार, गोप, मंगळसूत्र, राणी हार, बांगळ्या आदी दागिन्यांना महिलांची पसंती मिळत आहे. परंतु, गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.’’ सुशील शहा, व्यावसायिक, सराफा बाजार
फॅन्सी सेटला नागरिकांची पसंती
अक्षय्य तृतीयेला हा साडेतीन मुहूर्तातील एक समजल्या जात असल्याने दागिन्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची चांगलीच लगबग दिसून येते. मंगळसूत्र, सोन्याचे गोप अशा दागिन्यांना नागरिकांची पसंती मिळत आहे. तसेच या मुहूर्तावर महिलांसाठी नवीन डिझाइनचा अँन्टिक सेट एक चांगला पर्यांय आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त विक्री होण्याची शक्यता आहे. फॅन्सी सेटला नागरिकांची पसंती मिळत आहे’’ अश्विन शहा, व्यावसायिक, सराफा बाजार