आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटांसाठी सॉर्टिंग यंत्राचा वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- नऊ वर्षांपूर्वीच्या नोटा चलनातून परत घेण्याचा निर्णय म्हणजे, आता नागरिकांना त्यांच्याकडील नोटांवरील वर्ष भिंग घेऊ न शोधणे, असा नाही. अशा नोटा व्यवहारातून राष्ट्रीयीकृत बँकेत आल्यास, त्या सॉर्टिंग यंत्राद्वारे बाजूला होणार आहेत़ या ‘सॉइल’ नोटा म्हणून ओळखल्या जाणार असून, त्या चलनातून रद्द होतील. ही प्रक्रिया बँकेतच होणार आह़े त्यामुळे आता नोट 2005 पूर्वीची की नंतरची हे पाहण्याची सध्या तरी कसरत करावी लागणार नाही़

सन 2005 पूर्वीच्या नोटा परत घेतल्या जाणार, रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे शहरातील बँकांमध्ये चौकशीसाठी गर्दी होत आहे. नागरिकांच्या शंकांना उत्तर देणे बँक कर्मचार्‍यांना अशक्य झाले आह़े त्यातच रिझर्व्ह बँकेचा आदेश बँकांपर्यंत पोहोचला नसल्याने त्यात काय म्हटले आहे, हेदेखील कळत नव्हते. परंतु, अनेक बँकांमधील ज्येष्ठ अधिकार्‍यांनी या क्षणापासून 2005 पूर्वीच्या नोटा बदलण्याची गरज नाही, अशा नोटा व्यवहारातून बँकांत आल्यास बाजूला होतील, याची खात्री करून घेतली़

अशाच स्वरूपाचा एक आदेश ज्या शंभर, पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर सिल्वर थ्रेड (चांदीची तुटक तुटक तार) आहे, त्या नोटा चलनातून काढल्या जाणार असा होता. त्या वेळीही गोंधळ उडाला होता. या नोटा व्यवहारात चालू आहेत़ पण, ज्या वेळी अशा नोटा बँकेत जमा होतात त्या वेळी बाजूला निघतात. सन 2005 पूर्वीच्या नोटांबाबत हेच होणार आहे.