आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलितांवरील अत्याचार थांबवण्याची केली मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - दलितांवर होणारे अत्याचार थांबवण्यासह अन्य मागण्यांसाठी समतेचं निळं वादळ या संघटनेने २२ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

येथील गांधी भवन जयस्तंभ चौक येथून समतेचा हा मोर्चा संस्थापक अध्यक्ष अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वात निघाला. निळे झेंडे व घोषणाबाजी करत हा मोर्चा आठवडी बाजार, जनता चौक, कारंजा चौक, भोंडे सरकार चौक, स्टेट बँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. या वेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी भीमसैनिक जोरदार घोषणाबाजी करत होते. जिल्ह्यात कोरडा दष्काळ जाहीर करा, रमाई घरकुल योजना दोन लाख रुपयांची करा, आहे त्या जागेवर घरकुल बांधून द्या, सर्व जाती धर्माच्या लोकांना दािरद्र्यरेषेचे कार्ड द्या, अतिक्रमित जागा नियमानुकूल करा, राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळास राष्ट्रीय दर्जा द्या, विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती त्वरित द्या, बौद्धांना बौद्ध असे स्पष्ट दाखले द्या, जयस्तंभ चौकात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रमाणित पुतळे बसवावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.
या मोर्चात राज्य संघटक शांताराम इंगळे, डॉ. राजपालसिंह, लालाजी इंगळे, प्रकाश पसरेवाल, अलका झनके, अशोक दाभाडे, रजनी क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ पैठणे, दिलीप इंगळे आदींसह भीम सैनिकांनी सहभाग घेतला.
तगडा बंदोबस्त
आज भगवे व निळे वादळ घोंगावणार असल्याने सकाळपासूनच पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. दीड वाजता शिवसेनेचा जिल्हा मोर्चा निघाल्यानंतर दुपारी ३ वाजता समतेचं निळं वादळाचा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील महात्मा फुले चौकातील वाहतूक अन्य मार्गाने वळवली होती.