आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईच्या झळा कमी: अकाेलेकरांची तहान, वर्षभर भागवेल ‘महान’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महान- संपूर्ण अकाेला शहरासह नदीकाठावरील ५५ गावांची तहान भागवणारे धरण म्हणून महान जलाशयाकडे पाहिले जाते. त्याच्या नावासारखाच लाैकिक असलेल्या या ‘महान’ धरणातील पाण्याचा नियाेजनबद्ध पद्धतीने पाण्याचा वापर केला तर ताे अकाेला शहराला वर्षभर पुरेल एवढा अाहे.
सद्य:स्थितीत २४.९१ टक्के जलसाठा अाहे. धरणाची दुसरी बाजू पाहिली तर पाचपैकी दाेन व्हाॅल्व्ह उघडे पडले असून, ही बाबच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे सूचित करते. गतवर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईच्या झळा अधिक जाणवणार अाहेत. पावसाळ्यात एकही प्रकल्प शंभर टक्के भरला नसल्याने अत्यल्प जलसाठ्यामुळे अनेक ठिकाणची धरणे, लघू बंधारे डिसेंबरपासूनच काेरडी पडू लागली अाहेत. ग्रामीण भागात नाेव्हेंबर-डिसेंबरपासूनच पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे विदारक चित्र दिसू लागले अाहे. या सर्व परिस्थितीत अकाेला, मूर्तिजापूर तालुक्याला महान धरणातील जलसाठ्याचाच अाधार वाटताे. अत्यल्प पावसामुळे महान धरणही शंभर टक्के भरले नसले तरी त्यातील २४.९१ टक्के जलसाठ्यातील पाणी अकाेला शहराची पावसाळ्यापर्यंतची तहान भागवू शकते, असे तज्ज्ञांचे मत अाहे.
महान धरणातील पाणी नदीकाठावरील पाणलाेट क्षेत्रामधील परवानाधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी देणे बंद केले असून, धरणातील जलसाठा केवळ अकाेला शहरासाठी अारक्षित ठेवण्यात अाला अाहे. दगडपारवा धरणातील जलसाठा मूर्तिजापूर शहरासाठी अारक्षित असून, या वर्षी दगडपारवा धरणाची पाणीपातळी टक्के अाहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अादेशावरून महान धरणातून पाणी नदीच्या पात्रात साेडण्यात येते.
दगडपारवा धरणातील पाणी खांबाेरापर्यंत असलेल्या नदीद्वारे पाेहाेचवण्यात येत अाहे. तेथून पुढे ते माेटारपंपाद्वारे मूर्तिजापूरला पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
महान धरणात अत्यल्प पावसानंतरही तहान भागवण्याएवढा पाणी साठा अाहे. दुसऱ्या छायाचित्रात काही भाग काेरडाही पडलेला अाहे.

टीम महान
जलसाठ्याकडेउपविभागीय अधिकारी साेळंके यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता ए. ए. सैय्यद, एस. व्ही. जानाेरकार, अार. एस. पिंपळकर, एम. एच. पाठक, शिराळे अ. अजीज अादी कर्मचारी पाण्यावर अाणि त्याच्या नियाेजनावर लक्ष ठेवून अाहेत.

12 राेजीची जलपातळी
बार्शिटाकळीतालुक्यातील महान धरणाची १२ फेब्रुवारी रोजी नाेंदवली गेलेली जलपातळी अशी अाहे.- ११२०.५६ फूट, ३४१.५५ मीटर, २१.५११ दशलक्ष घनमीटर, २४.९१ टक्के एवढी असून, मागील वर्षी १२ फेब्रुवारी राेजीच महान धरणात ५६.०१ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध हाेता. मागच्या वर्षीच्या तुलनेत महान धरणाची जलपातळी ३१ टक्केने कमी अाहे. सध्याच्या स्थितीत महान धरणातून केवळ अकाेला शहरालाच पाणीपुरवठा सुरू अाहे.

पाचपैकी दाेन व्हाॅल्व्ह पडले उघडे
अकाेलाशहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथे जिल्ह्यातून सर्वात माेठे दहा गेटचे माेठ्या धरणाची निर्मिती करण्यात अाली. शहराला पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा, या उद्देशाने महान धरणात एकूण पाच व्हाॅल्व्ह बसवले अाहे. त्यापैकी १२ फेब्रुवारी राेजी दाेन व्हाॅल्व्ह पूर्णपणे पाण्यावरती उघडे पडले असून, उर्वरित तीन व्हाॅल्व्ह पाण्याखाली अाहेत. अाय. बी. िवश्रामगृहाकडील पाण्यामधील टेकड्याही उघड्यावर दिसत अाहेत.