आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचे अंदाज गेले वाहून; सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-यंदा मान्सून उशिरा येऊन जून महिना कोरडा जाईल आणि सलग दुस-या वर्षीही दुष्काळ पडेल, असा अंदाज हवामान खाते, पक्षी अभ्यासकांनी वर्तवला होता; तर भेंडवळ मांडणीने जून महिन्यात साधारण पाऊस सांगितला होता. मात्र, हे तीनही अंदाज खोटे ठरले असून, जिल्ह्यात आतापर्यंत जून महिन्याच्या सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे.

या हंगामात परिसरात ज्या झाडांवर कावळ्यांनी घरटी बांधण्यास सुरुवात केली, ती झाडाच्या अग्रभागी, उंचावर होती. त्यामुळे यंदा कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली गेली. दरम्यान, अलनिनोच्या प्रभावामुळे जून महिना कोरडा जाईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला होता, तर पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात साधारण पाऊस होईल, अशी शक्यता भेंडवळ मांडणीने व्यक्त केली होती.

प्रशांत महासागरात अल निनोची परिस्थिती निर्माण झाल्याने यंदा वार्षिक सरासरीच्या ८८ टक्केच पाऊस पडणार. यंदाही मान्सूनचे आगमन उशिरा होणार असून, जून महिना कोरडा जाणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात भरपूर पाऊस पडणार, असा अंदाज स्कायमेंटने सुरुवातीपासूनच व्यक्त केला होता. जून महिन्यात आतापर्यंत पडलेल्या पावसाने तो जवळजवळ खरा ठरला आहे.
यंदा एप्रिलमध्ये कावळ्यांनी झाडांच्या अग्रभागी घरटे बांधले होते. वर्ष २०१४ मध्येही कावळ्यांचे घरटे अग्रभागी होते. ते यंदाही आहे. कारण पक्ष्यांना पावसाचा अंदाज येतो. त्यामुळे हेही वर्ष दुष्काळाचे असेल.

भेंडवळच्या घटमांडणीत यंदा पहिल्या महिन्यात साधारण पाऊस पडणार होता, तर नंतर तीन महिने भरपूर पाऊस पडेल. यंदा कापसाचे पीक चांगले यईल. ज्वारीसाठीही पाऊसकाळ चांगला पण, पिकाची नासाडी होणार असल्याचे सांगितले. अवकाळी पाऊस शेतकंच्या अन्नात माती कालवणार असल्याचे भाकीत केले.
बातम्या आणखी आहेत...