आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daughter Harassment Issue At Akola, Professor Arrested By Police

त्या मुलीच्या छळप्रकरणी प्राध्यापिकेवर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मध्यप्रदेशातून घरकाम करण्यासाठी आणलेल्या १३ वर्षीय मुलीचा शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी अखेर एका प्रतिष्ठित कॉलेजच्या प्राध्यापिकेविरुद्ध रविवारी रात्री १२ वाजता खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी या मुलीचे बयाण बालकल्याण समितीने घेऊन, पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
कीर्तीनगरमध्ये राहणाऱ्या आभा खेडेकर लरातो वाणिज्‍य महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. त्यांचे पती अकोला अर्बनमध्ये नोकरी करतात. या उच्चशिक्षित दाम्पत्याने मध्य प्रदेशातील बुदनी येथील एका मुलीला घरकामासाठी तिच्या गरिबीचा फायदा घेऊन आणले होते. या मुलीला त्यांनी जीवापाड काम दिल्यामुळे मुलगी त्रस्त झाली होती. त्यामुळे या दाम्पत्याच्या छळाला कंटाळून अखेर या मुलीने घरात कोणी नसल्याचे बघून, पळ काढला. सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यामुळे त्यांनी घटनेची माहिती महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख ज्योती विल्हेकर यांना दिली. त्यांनी मुलीला शनिवारी सकाळी १० वाजता बसस्थानकावरून ताब्यात घेतले. मुलीची चौकशी आणि तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मुलीला मच्छरांनी चावल्याचे निदर्शनास आले होते. तर मुलीला व्हरांड्यात झोपायला भाग पाडत असल्याचे तिने सांगितले. पीडीत मुलीच्या वतीने ज्योती विल्हेकर यांनी रात्री १२ वाजता खदान पािलसात प्राध्यापिका आभा सुमित खेडेकर पती सुिमत मणिशंकर खेडेकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून कलम ३७४, ३४ भादंवि आणि २३ जस्टिस ज्युवेनिअल क्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आता प्राध्यापिकेवर कॉलेज काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
मॅनेज करण्याचा प्रयत्न
आम्हीमुलीला विकत आणले नाही, तिच्या आईच्या संमतीनेच आणले आहे, असा कांगावा करत या दाम्पत्याने प्रकरण िमटवण्याचा प्रयत्न केला. काही मध्यस्थांच्या मार्फत प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला.मात्र, बालकल्याण समितीपुढे कुणाचे काही चालले नाही.