आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा होताच दरवाढ, स्वस्ताईसाठी प्रतीक्षाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना दिलासादायक असल्याचा सूर सर्वत्र उमटला खरा. पण, प्रत्यक्षात चौथा दिवस आला, तरी अद्याप एकाही जीवनावश्यक वस्तूच्या किमती कमी झालेल्या दिसून येत नाहीत. घोषणा होताच दरवाढ झाली. मात्र स्वताईसाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पानुसार शेती, उद्योग, महिला सुरक्षा, गृह कर्ज, आयकराच्या मर्यादेत अडीच लाखांपर्यंत वाढ, स्किल इंडिया प्रोग्राम, अशा विविध बाबी मांडण्यात आल्यात. तसेच रेडीमेड कपडे, सौंदर्यप्रसाधने, विदेशी बनावटीच्या स्टील भांडी महागतील, असे सांगण्यात आले होते. अर्थसंकल्प जाहीर होऊन आज जवळपास चार दिवसांचा कालावधी उलटला, तरी ज्या वस्तंूचे भाव कमी होतील, त्यांचे भाव मंगळवारी जेवढे होते तेवढेच कायम असल्याचे दिसून येते. मात्र, रेडीमेड कपडे, सौंदर्यप्रसाधने, मद्य, सिगारेट यांच्या किमती बाजारपेठेत वाढल्याचे दिसून येते.

अर्थसंकल्प जाहीर होत असतानाच वाढले भाव
अर्थमंत्री जेटली हे अर्थसंकल्प जाहीर करत असतानाच टीव्हीवर विश्लेषण विविध प्रकारे करण्यात येत होते. भाषण संपत नाही तोच अचानक मार्केटमध्ये रेडीमेड कपडे, सौंदर्यप्रसाधने यांच्या किमती वाढलेल्या दिसून आल्या. त्यामुळे भाव वाढण्यासाठी जशी अध्यादेशाची गरज वाटत नाही, तशी कमी करण्यासाठी मग का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे.
सिगारेट, तंबाखूजन्य उत्पादने महागली
अर्थसंकल्पात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीवर कर वाढीची घोषणा होताच शहरातील विक्रेयांनी दरवाढीची अंमलबजावणी केली आहे. सिगारेट पाकिटांवरील छापील किमतीपेक्षा 10 ते 15 टक्के अधिक दर आकारणी सुरू झाली आहे. परिणामी, ग्राहकांच्या खिशाला कात्री पडली आहे.
एलईडी टीव्ही खरेदीत आतापासून फायदा
कर सवलतीमुळे व्हिडिओकॉन कंपनीने शुक्रवारपासूनच एलईडी टीव्हीच्या किमती 13,700 वरून कमी करत 12,750 रुपये केल्या आहेत. 1 टन क्षमतेच्या एसीची किंमत 27,500 रुपयांवरून कमी करत 25,600 रुपये केली आहे. 190 लिटर फ्रीजची किंमत 14,950 वरून 13,990 रुपये केली असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. इतर कंपन्यांनी मात्र दर कमी करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.
लॅपटॉपमध्ये किरकोळ बचत
संगणक आणि लॅपटॉपच्या सुट्या भागांवरील करात कपात केली असली तरी ती किरकोळ आहे. 22 ते 35 हजारांच्या दरम्यान मिळणार्‍या लॅपटॉपच्या किमतीमध्ये 500 ते दीड हजार रुपयांची बचत होणे शक्य आहे. मात्र, यासाठी आॅक्टोबरपर्यंत वाट पहावी लागेल, असे कॉम्प्युटर विक्रत्यांनी सांगितले.

तेल, साबण एक रुपयाने होईल स्वस्त
दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे खाद्यतेल आणि साबणाचे दर एक रुपयाने स्वस्त होणार आहे. शहरात दर महिन्याला तेल आणि साबण बाजारपेठेत सुमारे 10 ते 15 कोटींची उलाढाल होते. त्यामुळे याचा फायदा ग्राहकांना होणार असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.